18 November 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Morepen Lab Share Price | 33 रुपयाचा मॉरपेन लॅबोरेटरीज शेअर तेजीत, मागील 4 महिन्यात 40 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?

Morepen Lab Share Price

Morepen Lab Share Price | मॉरपेन लॅबोरेटरीज या स्मॉलकॅप फार्मा कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत वाढत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 34.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी जून 2023 च्या तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळत आहे. (Morepen Share Price)

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 48.40 रुपये होती. तर नीचांक किंमत 23.65 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह 33.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीने तब्बल 14.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती तिमाही अपडेटमध्ये जाहीर केली आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीच्या तुलनेत जून 2023 तिमाहीत कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ पाहायला मिळाली आहे.

मागील वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीने 5.63 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कंपनीने 403.45 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीत कंपनीने 303.31 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील 4 महिन्यांत मॉरपेन लॅबोरेटरीज शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे. 24 मार्च 2023 रोजी मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर 24.43 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. तर 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 34.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1720 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Morepen Lab Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

Morepen Lab Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x