15 January 2025 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त

Highlights:

  • Moschip Technologies Share Price
  • मागील तीन वर्षात 481.16 टक्के मल्टीबॅगर परतावा
  • कंपनीच्या निव्वळ नफ्यात 50.50 टक्के वाढ
  • मॉसचिप टेक्नोलॉजीज कंपनीबद्दल थोडक्यात
Moschip Technologies Share Price

Moschip Technologies Share Price | कोरोना काळात सर्व कंपन्यांचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर पोहोचले होते. मात्र कोरोना लाट ओसरल्यावर अनेक शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. त्यापैकीच एक मॉसचिप टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स आहेत.

29 मे 2020 रोजी मॉसचिप टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 10.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 60.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील तीन वर्षात 481.16 टक्के मल्टीबॅगर परतावा

मागील काही महिन्यांपासून मॉसचिप टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. मात्र कोरोना नंतरच्या रॅलीमध्ये या स्टॉकने लोकांचे पैसे गुणाकार केले होते. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 3.36 टक्के वाढले आहेत. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 481.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी मॉसचिप टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5.10 लाख रुपये झाले आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात 50.50 टक्के वाढ

मॉसचिप टेक्नोलॉजीज कंपनीने मार्च 2023 तिमाहीत महसुल संकलनात 43.89 टक्के वाढ नोंदवली आहे. या दरम्यान कंपनीच्या महसुलात 53.83 कोटी रुपयाची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 50.50 टक्के वाढ झाली असून कंपनीने 1.52 कोटी रुपये नफा कमावला आहे.

चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 21.38 टक्के वाढीसह 7.45 कोटी रुपये नोंदवला गेला होता. वार्षिक आधारावर मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 4.19 टक्के घसरणीसह 6.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 6.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2022 च्या आर्थिक वर्षात 22.97 कोटी रुपयाच्या तुलनेत कंपनीचा EBITDA 14.58 टक्के वाढीसह 26 32 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.

मॉसचिप टेक्नोलॉजीज कंपनीबद्दल थोडक्यात

मॉसचिप टेक्नोलॉजीज ही कंपनी मुख्यतः इंटरनेट ऑफ थिंग्ज/एव्हरीथिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी चिप डिझाईन सिस्टम, उत्पादन डिझाइन आणि विकास सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादन विभागांमध्ये सेमीकंडक्टर आणि एम्बेडेल देखील सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Moschip Technologies Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Moschip Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x