17 April 2025 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Motisons Jewellers IPO | कुबेर पावेल तुम्हाला! या IPO शेअरची किंमत 55 रुपये, पहिल्याच दिवशी 183% कमाई होईल

Motisons Jewellers IPO

Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा IPO 56 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा पहिल्याच दिवशी 15 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड या जयपुर स्थित रिटेल ज्वेलर्स कंपनीचा IPO सोमवारी 18 डिसेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 55 रुपये आहे. मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 151.09 कोटी रुपये आहे. मंगळवारी ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी हा IPO 51.88 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये ऑफर केलेल्या 1,92,29,700 शेअर्सच्या तुलनेत 99,75,59,250 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. या कंपनीचा IPO बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. आतापर्यंत या IPO चा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 80.99 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 68.77 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.48 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 डिसेंबर रोजी शेअर्स वाटप करेल. आणि 26 डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

ग्रे मार्केटमध्ये मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 55 रुपये आपल्या IPO इश्यू किमतीपेक्षा 101 रुपये अधिक किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा शेअर आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 183.64 टक्के अधिक नफा देण्याची शक्यता आहे. IPO च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 2,74,71,000 फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू केले आहेत.

मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आपल्या IPO द्वारे उभारलेला पैसा कॉर्पोरेट गरजा, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, अनुसूचित व्यावसायिक बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले आहे. तर बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून Holani Consultants Pvt Ltd कंपनीला नियुक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motisons Jewellers IPO 20 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Motisons Jewellers IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या