16 April 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?

MRPL Share Price

MRPL Share Price | एमआरपीएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 19 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 289.25 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 227.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. एमआरपीएल कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 21 टक्के कमजोर झाले आहेत. ( एमआरपीएल कंपनी अंश )

एमआरपीएल या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स अवघ्या एका वर्षात 273.73 टक्के मजबूत झाले आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 274 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी एमआरपीएल स्टॉक 2.59 टक्के घसरणीसह 216 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमआरपीएल स्टॉकचा RSI निर्देशांक 46.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. MRPL स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवसांच्या मुविंग सकरारी किंमत पातळीच्या खाली परंतु 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत.

एमआरपीएल या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,443 कोटी रुपये आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 138 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. एमआरपीएल स्टॉकच्या दैनंदिन चार्टवर 50 DEMA आणि विक्रीची तीव्रता पाहता सपोर्ट किंमत 200-190 रुपये दरम्यान पाहायला मिळत आहे. मात्र 240-250 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, एमआरपीएल स्टॉक 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या 24 टक्के खाली जाऊ शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, एमआरपीएल स्टॉकची सपोर्ट लेव्हल 180-200 रुपये किमतीवर पाहायला मिळत आहे.

मात्र गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करताना 260 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावावा. Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, एमआरपीएल स्टॉकमध्ये 242 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 215 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर 189 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत एमआरपीएल कंपनीने 1,908 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2024 तिमाहीत एमआरपीएल कंपनीचा निव्वळ नफा 40 टक्के घसरून 1,137 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 29,401 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 29,190 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एमआरपीएल कंपनीने 1,24,736 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीने 1,05,223 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. एमआरपीएल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 2 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मार्च तिमाहीमध्ये कंपनीचा PAT 36.32 टक्के वाढून 3,596 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MRPL Share Price NSE Live 09 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

MRPL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या