18 November 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Mufin Green Share Price | मल्टिबॅगर मुफिन ग्रीन फायनान्स शेअर्समध्ये दररोज अप्पर सर्किट, स्टॉक वाढीचे कारण?

Mufin Green Share Price

Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 106.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीशी संबंधित कोणतीही मोठी बातमी समोर आलेली नाही, तरही स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 111.76 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या 1.86 लाख शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ई-वाहनांसाठी वित्त पुरवठा करणारी कंपनी आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना पाच टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयेवरून 167 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 29 ऑक्टोबर 2021 रोजी पासून आतपर्यंत 2100 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात, कोलकात्ता स्थित कॅब सेवा पुरवणाऱ्या स्नॅप आय कॅप्स कंपनीने मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी सोबत व्यापारी करार केल्याची माहिती दिली होती.

या कराराअंतर्गत मफिन ग्रीन फायनान्स कंपनी 100 टाटा टागोर कार स्नॅप आय कॅप्स कंपनीला 5 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार आहे. लीजच्या अटी पूर्ण झाल्यानंतर, स्नॅप कॅब कंपनीला या कार खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे स्नॅप ई-कॅब कंपनीचा कॅबचा ताफा 500 कॅबपर्यंत वाढणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mufin Green Share Price NSE 31 October 2023.

हॅशटॅग्स

Mufin Green Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x