17 April 2025 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Multibagger IPO | या शेअरने कमी कालावधीत 63 टक्के परतावा दिला, आता ब्रोकरेजकडून नवी टार्गेट प्राईस, खरेदीचा सल्ला

Multibagger IPO

Multibagger IPO | शेअर बाजारात आपण पाहू शकतो की मागील काही आठवड्यापासून पुन्हा एकदा विक्रीचा दबाव सुरू झाला आहे. फेडरल बँकेने व्याज दर वाढवण्याची घोषणा केल्या पासून गुंतवणूकदारांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे, आणि त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आज आपण आशय एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, जो विक्रीच्या दबावापुढे झुकला नाही, प्रवाहाच्या विपरीत तो वाढतच चालला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे, “कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस” अर्थात “KIMS”. ह्या कंपनीचे शेअर्स चालू वर्षाच्या नीचांकी पातळी किमतीवरून पुन्हा रिकव्हरी करू लागले आहेत. मागील एका महिन्यात शेअरमध्ये 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

KIMS ही आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपनी असून, हा स्टॉक मागील वर्षी जुलैमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. गुंतवणूकदारांना ह्या स्टॉक ने आतापर्यंत 63 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीज KIMS स्टॉकबाबत सकारात्मक आहे, आणि स्टॉकमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे, की कंपनीचे फंडामेंटल मजबूत आहेत, आणि KIMS चा स्टॉक पुन्हा एकदा त्याच्या सर्वकालीन उच्च किंमत पातळीला स्पर्श करेल. ब्रोकरेज फर्मने KIMS च्या स्टॉकला “बाय”(खरेदी) रेटिंग दिले आहे.

स्टॉकची टार्गेट किंमत 1565 रुपये :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने जाहीर केलेल्या नोट्समध्ये म्हंटले आहे की, KIMS ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात आघाडीची प्राइवेट हेल्थ सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी आहे. कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त मजबूत असल्याचे दिसून येते. KIMS कंपनी प्रचंड वेगाने आपला उद्योग विस्तारही करत आहे. महाराष्ट्रात नाशिक आणि नागपूर येथे नुकत्याच सुरू झालेल्या केंद्रामुळे आणि महाराष्ट्र आणि बंगलोरमधील विस्तार योजनांमुळे KIMS मध्ये सकारात्मक वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्म चे म्हणणे आहे, की कंपनीचा दीर्घकालीन दृष्टीकोन उद्योग विस्तारासाठी खूप सकारात्मक आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये KIMS एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन सकारात्मक आहेत. रुग्णालय उद्योगामध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. पुढील काही दिवसांत हा शेअर 1565 रुपये पर्यंत जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर सध्या 1300 रुपये वर ट्रेड करत आहे.

काही जोखीम घटक :
ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे, की आर्थिक वर्ष 2022 ते आर्थिक वर्ष 2024 दरम्यान KIMS कंपनीची महसूल वाढ 26.7 टक्के CAGR असू शकते. त्याच वेळी, उद्योग विस्तार योजनेमुळे, EBITDA मार्जिन 28 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. कंपनीमध्ये काही जोखमीचे घटक देखील आहेत, उदाहरणार्थ, कंपनीचे उद्योग विस्ताराचे लक्ष फक्त दक्षिण भारतातच आहे. आणि यासाठी आणखी काही कालावधी वाट पहावी लागणार आहे.

IPO लाँच 63 टक्के मजबूत :
7 जुलै 2021 रोजी KIMS चा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. IPO मध्ये इश्यू किंमत 825 रुपये प्रती शेअर होती, तर शेअर 1009 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक मध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली होती,शेअरची किंमत 1097 रुपयांवर गेली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 1350 रुपयेवर बंद झाला होता. या अर्थाने स्टॉक आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्केचा जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या स्टॉकची उच्चांक किंमत 1565 रुपये असून, नीचांकी किंमत 1000 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO KIMS share price return on investment on 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)share market(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या