22 November 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger IPO | या शेअरवर 10 दिवसात 27 टक्के पेक्षा अधिक परतावा, 10 दिवस स्टॉक तेजीत, वेगाने पैसा वाढतो आहे, नाव सेव्ह करा

Multibagger IPO

Multibagger IPO | कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्याचा उद्योग करणाऱ्या एका कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे EP Biocomposites. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE SME निर्देशांकावर 27 टक्के पेक्षा अधिक प्रीमियमसह 160.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. EP Biocomposites चे शेअर्स IPO मध्ये 126 रुपये किमतीत ऑफर करण्यात आले होते आणि IPO ची मुदत संपल्यावर त्यांचे वाटप करण्यात आले. हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून त्याचे गुंतवणूकदार आता मालामाल झाले आहेत. स्टॉक जबरदस्त प्रीमियम किमतीवर ओपन झाला आणि शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सलग 10 व्या दिवशी 5 टक्केच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.

सलग अप्पर सर्किट :
EP Biocomposites चे शेअर्स सलग 10 व्या दिवशी शेअर बाजारात अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. EP Biocomposites IPO हा NSE आणि BSE वर सूचीबद्ध झाल्यापासून सलग 10 व्या ट्रेडिंग सेशनमध्येही 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती आणि अजूनही शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता असल्याचे आपण पाहू शकतो. तथापि, अश्या पडझडीतही EP Biocomposites कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. 26 सप्टेंबर रोजी EP Biocomposites च्या शेअर्सची किंमत 260.25 रुपये होती,आणि दिवसा अखेर स्टॉक अप्पर सर्किटवर बंद झाला होता. ह्या कंपनीचे शेअर्स दररोज एक नवीन उच्चांक किंमत गाठत आहे.

सिंगापूरच्या FII ने केली मोठी गुंतवणूक :
सिंगापूरची परकीय गुंतवणूक संस्था Nav Capital VCC- Nav Capital Emerging Star फंडने EP Biocomposites कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. सिंगापूरच्या या प्रसिद्ध FII ने EP Biocomposites चे 12000 शेअर्स 224.15 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने खरेदी केले आहेत. 21 सप्टेंबर 2022 रोजी या परकीय गुंतवणूक संस्थेने ही खरेदी डील पूर्ण केली. कंपनीचा IPO 29 ऑगस्ट 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि तो 5 सप्टेंबर 2022 रोजी बंद झाला. गुंतवणूकदारांनी ह्या कंपनीचा IPO 18.51 पट अधिक सबस्क्राइब केला. एकूण IPO कोट्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 15.44 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 160.25 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले आणि 5 टक्केच्या अप्पर सर्किटसह 168.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of EP Biocomposites share are trending on upper circuit after listing on BSE & NSE on 27 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x