22 February 2025 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Multibagger IPO | या शेअरने फक्त एकदिवसात 35 टक्के परतावा दिला, पुढे अजून किती वेगाने पैसा वाढवणार?, नाव नोट करा

Multibagger IPO

Multibagger IPO | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा IPO काल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला. आठवड्याच्या सुरवातीपासूनच शेअर बाजाराची स्थिती नरम गरम आहे. बाजारात प्रचंड अस्थिरता आहे, आणि विक्रीचा दबाव असल्यामुळे सर्व शेअर्स पडले आहेत. BSE आणि NSE मध्ये मोठ्या कंपनीचे स्टॉक ह्या पडझडीला तोंड देत आहेत. काल आयटी सेक्टर, मेटल, आणि ऑटो स्टॉक मध्ये प्रचंड प्रमाणात घसरण दिसून आली होती. अश्या परिस्थतीत देखील हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा शेअर NSE आणि BSE वर प्रीमियममध्ये सूचीबद्ध झाला होता. गुंतवणूकदारांनी त्यात चांगला नफा कमावला आहे.

NSE वर शेअर्सची लिस्टिंग किंमत :
काल हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा शेअर NSE वर 450 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला. या कंपनीची आयपीओ मध्ये शेअर इश्यू किंमत 330 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.अशाप्रकारे, शेअर्सच्या प्रीमियम लिस्टिंगमधून गुंतवणूकदारांना 35 टक्के म्हणजे प्रति शेअर 120 रुपये नफा झाला आहे.

BSE वर शेअरची लिस्टिंग किंमत :
हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा IPO काल BSE निर्देशांकावर 444 रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध झाला होता. अशा प्रकारे, हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना BSE वर प्रति शेअर 114 रुपये परतावा मिळाला. BSE निर्देशांकावर हर्षा इंजिनियर्सच्या IPO मधून गुंतवणूकदारांनी 39 टक्के नफा कमावला आहे.

हर्ष इंजिनियर्स IPO चे तपशील :
14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2022च्या दरम्यान हर्षा इंजिनियर्सचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 21 सप्टेंबर 2022 रोजी IPO बंद झाल्यानंतर शेअर्सचे वितरण करण्यात आले होते. कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी 17.6 पट शेअर्स सबस्क्राइब केले होते. IPO मध्ये शेअर्स 74.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने IPO मध्ये शेअर्सची किंमत 314 रुपयांवरून 330 रुपये दरम्यान निश्चित केली होती. IPO च्या माध्यमातून कंपनीने 300 कोटी रुपये जमा केले आहेत.

कंपनी बद्दल सविस्तर :
हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड विमानचालन आणि एरोस्पेस, रेल्वे, ऑटोमोटिव्ह, अक्षय ऊर्जा, कृषी आणि इतर उद्योगांसाठी विविध अभियांत्रिकी उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याचे उद्योग करते. बांधकाम, आणि खाण क्षेत्रात अभियांत्रिकी उत्पादने पुरवणारी ही एक अग्रणी कंपनी मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of Harsha Engineering international limited share is listed on 27 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x