5 November 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

Multibagger IPO | मल्टिबॅगर IPO! एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स IPO चे गुंतवणुकदार मालामाल झाले, अल्पावधीत 450 टक्के परतावा

Multibagger IPO

Multibagger IPO | शेअर बाजारात अनेक IPO येत जात असतात. मात्र गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणारे IPO मोजकेच असतात. 2023 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच झाले आहेत. मात्र एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीच्या IPO एवढा परतावा देणारा IPO क्वचितच पाहायला मिळतो. एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचा IPO एप्रिल 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हा आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 448.28 टक्के नफा कमावून दिला आहे.

7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 350.90 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचे शेअर 1.87 टक्के घसरणीसह 301.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाखावर 5 लाख परतावा :

एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एक लाखावर 5 लाख रुपये नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी केली आहे. एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स ‘एम’ गटाच्या सिक्युरिटीज अंतर्गत बीएसई एसएमई एक्सचेंजवर ट्रेड केले जातात. या कंपनीचा IPO स्टॉक 64 रुपये किंमत बँडवर वाटप करण्यात आला होता.

एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचा IPO 31 मार्च ते 5 एप्रिल 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 ते 64 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. IPO च्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी स्टॉक 1.95 पट अधिक सबस्क्राइब केला होता. एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 17 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. तर 7 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 350.90 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता.

गुंतवणुकीवर परतावा :

जर तुम्ही स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.61 लाख रुपये झाले असते. एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जगभरात 75 पेक्षा अधिक देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या ईटन कॉर्पोरेशन या 100 वर्षे जुन्या पॉवर मॅनेजमेंट समूहाने एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीला आपल्या वार्षिक कार्यक्रमासाठी इव्हेंट ऑर्डर दिली आहे. यासह जगातील सर्वात मोठी विमा कंपनी AXA ही इन्शुरन्स सर्व्हिस प्रदान करणारी कंपनी 51 पेक्षा जास्त देशांमध्ये, 1350 हून अधिक कर्मचाऱ्यांसह एक्झिकॉन इव्हेंट मीडिया सोल्यूशन्स कंपनीची वार्षिक कार्यक्रमासाठी F & B सेवा घेणारी दुसरी कंपनी होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO stock return on 10 August 2023

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x