18 April 2025 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! असे शेअर खरेदी करा, किंमत आजही 51 रुपये, पण परतावा दिला 2300 टक्के, तपशील पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची उपकंपनी रिव्हॉल्ट मोटर्स ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. नुकताच या कंपनीने लिमिटेड एडिशन स्टेल्थ ब्लॅक RV 400 इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात लॉन्च केली आहे. रिव्हॉल्ट मोटर्स कंपनीने आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त या लिमिटेड एडिशन RV400 बाईकचे अनावरण केले आहे. ही लिमिटेड एडिशन RV400 स्टेल्थ बाईक काळ्या रंगात अनावरण करण्यात आली आहे. (Rattanindia Enterprises Share Price)

इलेक्ट्रिक वाहने आवडणाऱ्या लोकांना ही नवीन नाईक अक्षरशः भुरळ घालत आहे. RV400 बाईककडे प्रगत तंत्रज्ञानाचे एक शानदार उदाहरण म्हणून पाहिले जाते आहे. रिव्हॉल्ट मोटर्स कंपनीची RV400 इलेक्ट्रिक बाइक लॉन्चिंग लच्या आधीपासूनच लोकप्रिय झाली होती. रिव्हॉल्ट मोटर्स कंपनीची मुख्य कंपनी रतन इंडिया एंटरप्रायझेसचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.73 टक्के वाढीसह 51.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची सध्याची किंमत?

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3.52 टक्क्यांच्या वाढीसह 53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.40 टक्के वाढीसह 55.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 1 महिन्यात 35 टक्के परतावा दिला

मागील 5 दिवसात रतन इंडिया कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 6.33 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील 1 महिन्यात रतन इंडिया कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत 33 टक्के परतावा दिला

मागील 6 महिन्यांत रतन इंडिया कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 28 मार्च 2023 रोजी रतन इंडिया कंपनीचे शेअर्स 35 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीपासून रतन इंडिया स्टॉक 70 टक्के वाढला आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7032 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 57.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32.15 रुपये होती.

मागील दहा वर्षात शेअरने 2300 टक्के परतावा दिला

रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनी नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीची विक्री 84 टक्के वाढीसह 1267 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. तर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 200 टक्के वाढीसह 206 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीने जून तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 184 टक्के वाढीसह 178 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील 5 वर्षात रतन इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 1300 टक्के वाढली आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 2300 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock for investment on 26 August 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या