15 November 2024 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

Multibagger Stock | IPO लाँच झाल्यापासून ते अजूनही हा शेअर तगडा परतावा देतोय, मागील 3 दिवसांत 22% परतावा, खरेदी करणार?

Multibagger Stock

Multibagger Stock | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ या ड्रोन कंपनीचे शेअर्स पाच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड मजबूत आहेत. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ नुकताच FY2023 तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

परिणाम स्वरूप शेअर्समध्ये 22 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या तीन दिवसांत हा स्टॉक 22 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 154.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ‘DroneAcharya Aerial Innovations’ कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 742 टक्के वाढीसह 3.42 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. याच कालावधीत कंपनीने 417 टक्क्यांच्या वाढीसह 18.57 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कंपनीचे संस्थापक आणि एमडी ‘प्रतीक श्रीवास्तव’ यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या दृष्टिकोनाविषयी आता बोलणे योग्य नाही. मात्र औद्योगिक, एंटरप्राइझ आणि संरक्षण श्रेणीतील ड्रोन विभागातील अलीकडील प्रवेशामुळे ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या व्यवसायात सकारात्मक वाढ पाहायला मिळेल.

‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार करायला सुरुवात केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये तज्ञांनी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा व्यवसाय वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने वित्तीय वर्ष 2024 मध्ये 45-50 कोटी रुपहे महसूल जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनीने नुकताच थायलंडच्या मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. आणि त्यासाठी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत भागीदारी केली आहे.

गुंतवणूकीवर परतावा :
द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा IPO मागील वर्षी 13-15 डिसेंबर 2022 दरम्यान शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 34 कोटी रुपये होता. अणि हा IPO 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. कंपनीने IPO स्टॉक 54 रुपये किंमतीवर जारी केले होते. 23 डिसेंबर रोजी ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स 107.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग च्या दिवशी या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते.

त्यानंतर 12 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 243.35 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. म्हणजेच IPO मधे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत 351 टक्के परतावा मिळाला. सध्या हा स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 35 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of DroneAcharya Aerial Innovations Share price today on 05 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x