18 April 2025 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! नॉलेज मरीन शेअर दिग्गज का खरेदी करत आहेत? अवघ्या 2 वर्षात 2,882 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी सुसाट तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील स्टॉकमध्ये किंचित प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.

नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार आशिष कचोलिया यांनी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीमध्ये आपला वाटा 2.78 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे गुंतवणुकदारांना स्टॉकवरील विश्वास आणखीच वाढला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 1,100.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1300 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः मरीन क्राफ्ट आणि ड्रेजिंगची मालकी, संचालन आणि दुरुस्ती संबंधित व्यवसाय करण्याचे काम करते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 180.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षापुर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.36 लाख रुपये झाले आहे.

नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,882.36 टक्के नफा मिळवून दिला आहे. 26 मार्च 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 36.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आश्चर्यकारक उसळी घेतली आहे. ज्या लोकांनी दोन वर्षांपूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 29.82 लाख रुपये झाले आहे.

मागील काही महिन्यांपासून नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.55 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. आशिष कचोलिया यांनी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीमध्ये आपला वाटा वाढवला असल्याची बातमी येताच गुंतवणूकदारांनी देखील स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Knowledge Marine & Engineering Works share price today on 24 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या