Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने गुंतवलेला मूठभर पैसा 4 वर्षात ढीगभर केला, हा स्टॉक ठरला करोडपती बनवणारा

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात अनेक महिन्यापासून चढ-उताराचे चक्र फिरत आहे. मात्र, इतर देशांच्या शेअर बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार खूप चांगल्या स्थितीत व्यवहार करत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील कामगिरी पाहिली तर आपल्याला समजेल की अनेक वर्षांपासून हा उद्योग क्षेत्र दबावाखाली व्यापार करत आहे. परंतु, या क्षेत्रातील काही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावाही कमवून दिला आहे. अशीच एक मजबूत परतावा देणारी कंपनी आहे, “नॅशनल स्टँडर्ड इंडिया लिमिटेड”. या कंपनी शेअरने लोकांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. मागील 4 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहे.
नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 25 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE वर 4,966.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 3 जून 2018 रोजी BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाला होता, तेव्हा रोज 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 4 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22,577.85 टक्के चा छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.
प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 10 टक्क्यांनी वर गेले आहेत. जर आपण या स्टॉकचे अलीकडील चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 2.40 टक्क्यांनी पडला आहे. त्याचप्रमाणे, 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीचे शेअर्स 47 टक्क्यांनी पडले आहेत. नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 9.93 हजार कोटी रुपये आहे.
1 लाखावर मिळाला 2.26 कोटी परतावा :
जर तुम्ही 23 जून 2018 रोजी म्हणजेच 4 वर्षांपूर्वी नॅशनल स्टँडर्ड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आजपर्यंत आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणूकीचे मूल्य वाढून 2.26 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे तुम्ही जर चार वर्षापूर्वी या स्टॉक मध्ये केवळ 50 हजार रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.12 कोटी रुपये झाले असते.
कंपनीबद्दल थोडक्यात :
ऑगस्ट 1962 मध्ये नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. पूर्वी या कंपनीचे नाव नॅशनल स्टँडर्ड डंकन लिमिटेड होते, त्यात नंतर बदल करून नॅशनल स्टँडर्ड इंडिया असे ठेवण्यात आले. मे 2011 मध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लोढा यांच्या उद्योग समूहाने ही कंपनी विकत घेतली होती. तेव्हापासून ही कंपनी लोढा ग्रुपचा भाग म्हणून काम करत आहे. ही कंपनी उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी निवासी प्रकल्प बनवते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger stock of National Standard India Limited share price return on investment on 28 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB