Multibagger Stocks | 201 टक्के परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर कंपनीच्या राइट्स इश्यूमुळे स्वस्तात मिळतोय, स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | रिअल इस्टेट क्षेत्रातील खाजगी कंपनी “श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स” लिमिटेड एक स्मॉल कॅप कंपनी असून शेअर बाजारात SME इंडेक्स अंतर्गत सूचीबद्ध आहे. कंपनीने नुकताच आपल्या भागधारकांना माहिती कळवली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत राइट्स इश्यू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, कंपनी आपल्या विद्यमान भागधारकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे.
कंपनीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, 11 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत राइट्स इश्यूच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मात्र, राइट्स इश्यूचा आकार आणि रेकॉर्ड तारीख कंपनीने अद्याप जाहीर केली नाही. राइट्स इश्यू मध्ये कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना नवीन शेअर्स खरेदी करण्याची संधी देणार आहे.
10 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 201.56 टक्क्यांची मजबुती वाढ पाहायला मिळाली आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी आतापर्यंत 53.98 टक्के परतावा कमावला आहे. 2022 मध्ये या कंपनीने सकारात्मक प्रदर्शन केले आहे. शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. या रिअल इस्टेटच्या कंपनीचे स्टॉक 33.13 टक्के वर गेले आहेत. कंपनीचे प्रॉमोटर्स कंपनीतील एकूण गुंतवणुकीपैकी 75.22 टक्के वाटा होल्ड करत आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीचे एकूण 24.56 टक्के स्टॉक आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Shraddha Prime Projects share price return on investment on 17 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या