22 January 2025 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Multibagger Stock | केवळ सुझलॉन शेअर्सवर नजर नका ठेऊ! हा एनर्जी शेअर करोडपती करतोय, 3 वर्षांत 7973 टक्के परतावा दिला

Multibagger Stock

Multibagger Stock | ज्या गुंतवणूकदारांनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अवघ्या 3 वर्षांत 7973 टक्के वाढले आहेत. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3 वर्षात मालामाल केले आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स फक्त 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Waaree Renewable Share Price)

आता हा स्टॉक 1300 रुपये किमतीवर पोहोचला आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 16.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 1,330.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2020 मध्ये या शेअरवर एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख रुपये झाले असते.

शेअरची कामगिरी – Waaree Renewable Share Price

17 ऑगस्ट 2022 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 354.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 जुलै 2023 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 1,338.00 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2732.36 कोटी रुपये आहे. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या दैनिक चार्टवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स प्रमाण 52.2 अंकावर, जे स्टॉक ओव्हरबाट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही, याचे निर्देशक आहे. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या वार्षिक बीटा 0.4 आहे, जो कमी अस्थिरतेचे निर्देशक आहे.

जून तिमाही कामगिरी

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 16 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 13.1 कोटी रुपये ऑपरेटींग नफा नोंदवला होता. जून 2023 च्या तिमाहीत, कंपनीने 129.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 95.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2022 च्या तिमाहीत वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनीने 10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2023 तिमाहीत या कंपनीने 11.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी ही कंपनी वारी ग्रुपचा भाग असलेली उपकंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः सोलर ईपीसी संबंधित व्यवसाय करते. सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वारी ग्रुपने आतापर्यंत 600 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या 10000 पेक्षा जास्त सौर प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Waaree Renewable Technologies Share Price on 19 August 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x