22 January 2025 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stocks | याला म्हणतात नशीब, या शेअरमध्ये फक्त 25,000 रुपयांची गुंतवणूक करून करोडमध्ये परतावा मिळाला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतात, पण खरेतर शेअर बाजारातून नफा तोच कमावतो, जो दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतो. असाच एक शेअर आमच्या नजरेत आला आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूकीवर करोडोचा परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, तो आहे Astral Limited. मागील 15 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे करोडो रुपयांत रूपांतर केले आहे.

Astral Share Price :
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून दीर्घकाळ संयमाने होल्ड करून ठेवली तर तुम्हाला शेअर बाजार नक्कीच भरघोस परतावा मिळवून देणार. यासाठी तुम्हाला फक्त मल्टी बॅगर स्टॉक निवडता आला पाहिजे. शेअर मध्ये वाढीची कमालीची क्षमता असली पाहिजे, कंपनीवर कर्ज नसले पाहिजे, आणि कंपनीचा मागील काही वर्षातील महसूल आणि नफा सकारात्मक असला पाहिजे. अश्या स्टॉक मध्ये जी तुम्ही गुंतवणूक करून संयमाने होल्ड करता, तर तुम्ही दीर्घकाळात मल्टीबॅगर परतावा कमवू शकता.

Astral Limited कंपनीच्या शेअरनी मागील 15 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. गुंतवणुकदारांचे पैसे करोडो रुपयांत रूपांतर केले आहे. त्याच वेळी, जर आपण ह्या स्टॉक च्या मागील 25 वर्षांतील परताव्याची आकडेवारी पहिली, ते आपल्याला दिसेल की, या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आतापर्यंत 42,050 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे.

स्टॉकचा इतिहास थोडक्यात :
16 सप्टेंबर रोजी Astral Pipes कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 2338 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2007 मध्ये हा शेअर फक्त 5.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 23 मार्च 2007 रोजी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.21 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही या शेअरवर 25,000 रुपये लावले असते, तर तुमच्या 25000 रुपयेचे दीड कोटी रुपये झाले असते. मागील एका महिन्यात ह्या स्टॉक मध्ये सुमारे 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, एस्ट्रल पाईपच्या स्टॉकने एका वर्षात 13.75 टक्के परतावा दिला आहे. मागील 5 वर्षांत हा स्टॉक 433 टक्क्यांनी वाढला आहे. जर एखाद्याने या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी फक्त 1 लाख रुपये लावले असते तर, आज त्याला तब्बल 5.33 लाख रुपयेचा परतावा मिळाला असता.

कंपनीची आर्थिक स्थिती :
28 जून रोजी जाहीर केल्लेल्या तिमाही नफ्यात कंपनीचा एकूण नफा 96 कोटी रुपये होता. यापूर्वी मागील आर्थिक वर्षात जून तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण नफा 75 कोटी होता. चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा कर 73 टक्के वाढुन 1213 कोटी रुपये झाला अहे, जो मागिल आर्थिक वर्षात 701 कोटी रुपये होता.

कंपनीबद्दल सविस्तर :
एस्ट्रल कंपनी ही प्रसिद्ध पाईप बनवणारी कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय मुख्यतः प्लंबिंग उत्पादन उद्योग, ड्रेनेज, केबल संरक्षण यासह इतर अनेक क्षेत्रांसाठी पाइपिंग सोल्यूशन्स प्रदान करण्याशी संबंधित आहे. Astral ही भारतातील पाइपिंग उद्योग क्षेत्रातील टॉपची कंपनी मानली जाते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Astral ही भारतातील पहिली कंपनी आहे जीने भारतात सर्वात पहिल्यांदा CPVC पाइपिंग सुविधा आणली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks Astral Limited share price return on 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x