18 December 2024 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305 NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 8 लाखांपर्यंत परतावा, फायद्याच्या योजनेचा लाभ घ्या EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरसाठी तज्ज्ञांकडून रेटिंग, चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! 5 शेअर्सनी फक्त 5 दिवसात 80% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

Multibagger Stocks

Multibagger Stock s| 2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली होती. एफएमसीजी आणि हेल्थकेअर सेक्टरसोडून इतर सेक्टर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. इक्विटी बेंचमार्कने मागील आठवड्यातील 80 टक्के नुकसान रिकवर केले आहे. मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 1,000 अंकांच्या वाढीसह 60,841 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 300 अंकाच्या वाढीसह 18,105 अंकावर बंद झाला होता. डिसेंबर 2022 मध्ये इक्विटी बेंचमार्क निर्देशांक 3.5 टक्क्यांनी कमजोर झाले होते. निफ्टी मिडकॅप-100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप-100 इंडेक्स अनुक्रमे 4.5 टक्के आणि 6 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. मागील महिन्यात निफ्टी PSU बँक इंडेक्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती. बँक इंडेक्स अवघ्या एका आठवड्यात 11 टक्के वाढला होता. त्यानंतर धातू, ऑइल आणि वायू, ऑटो, ऊर्जा या इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत 5 कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 80.8 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमवून दिला आहे.

MPDL : (MPDL Share Price | BSE 532723)
MPDL ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बजाबर भांडवल 23.05 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 80.8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. हा स्टॉक मागील 5 दिवसात 17.20 रुपये किमतीवरुन 31.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 31.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 3.54 टक्के वाढीसह 32.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 80.81 टक्के म्हणजेच 1.80 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे जोखीमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

टेक्सेल इंडस्ट्रीज : (Texel Industries Share Price | 526638)
टेक्सेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कंपनीचा शेअर 35.35 रुपये किमतीवरून 57.70 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी हा कंपनीच्या शेअर्समधून अल्पावधीत 63.22 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 48.12 कोटी रुपये आहे. अवघ्या 5 दिवसात या स्टॉकने लोकांना 63.22 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा FD सारख्या गुंतवणूक पर्यायापेक्षा अनेक पट चांगला आहे. मागील शुक्रवारी हा शेअर 7.05 टक्क्यांच्या वाढीसह 57.70 रुपयांवर क्लोज झाला होता, तर सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 8.15 टक्के घसरणीसह 53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

संदेश लिमिटेड : (Sandesh Share Price | Sandesh Stock Price | BSE 526725 | NSE SANDESH)
मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 58.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकमध्ये 775.90 रुपये पासून खरेदी सुरू झाली आहे, आणि स्टॉक अल्पावधीत 1232.45 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत 58.84 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 932.89 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 5.92 टक्के घसरणीसह 1160.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फर्टिलायझर्स आणि केमिकल्स त्रावणकोर : (Fertilizers & Chemicals Travancore Share Price | BSE 590024 | NSE FACT)
फर्टिलायझर्स आणि केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. हा स्टॉक अल्पावधीत 241.85 रुपयांवरून 371.70 रुपयांपर्यंत वाढला आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 53.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 24,051.67 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी जा स्टॉक 5 टक्के घसरणीसह 354.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सदर्न पेट्रोकेमिकल्स : सदर्न पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. हा स्टॉक अल्पावधीत 61.60 रुपयांवरून वाढून 87.30 रुपयांवर आला आहे. या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 41.72 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,777.78 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 3.32 टक्के वाढीसह 90.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks given huge Return in Last week check details on 02 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x