21 February 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | येस बँक शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, पुढे किती घसरणार स्टॉक - NSE: YESBANK EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
x

Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षात 1 लाख गुंतवणुकीवर 34 लाख परतावा, आता मिळणार फ्री बोनस शेअर

Multibagger stock

Multibagger Stocks| गुंतवणुकीचान्यात GKP प्रिंटिंगच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त परतावा देऊन सुखद धक्का दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले होते त्याच्या गुंतवणुकीचे आता 34 लाख रुपये झाले आहेत. आणि गुंतवणूकदार आणखी एक सुखद धक्का म्हणजे कंपनी आता बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

परतावा आणि बोनस शेअर: GKP प्रिंटिंग कंपनी ही पॅकेजिंग उद्योगाशी संबंधित क्षेत्रात काम करते आणि कंपनी स्मॉलकॅप म्हणजे लघु भांडवल गटात मोडते तरीही ह्या कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. GKP प्रिंटिंग आणि पॅकेजिंग कंपनी लघु भांडवल गटात मोडते पण त्यांचा व्यापार हा विस्तारलेला आहे. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्स वर गेल्या 6 महिन्यांत विश्वास दाखवला आणि शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.म्हणजेच कंपनीच्या शेअर मध्ये तब्बल 60% ची वाढ झाली आहे. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुम्हाला 34 लाखांपेक्षा जास्त परतावा भेटला असता. GKP प्रिंटिंग कंपनीच्या संचालकांनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मागील वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना सप्टेंबर 2021 मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते म्हणजे जर तुमच्या कडे कंपनीचा एक शेअर असेल तर कंपनी तुम्हाला त्यावर आणखी एक शेअर मोफत देईल. GKP प्रिंटिंगच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 25% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

1लाख गुंतवणुकीचे झाले 16 लाख :
GKP प्रिंटिंग कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ज्यावेळी नोंदणीकृत झाली त्यावेळी शेअरची किंमत 26.70 रुपये होती, ज्या गुंतवणूकदारांनी ह्या मागील वर्षी ह्या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांना एका वर्षात 16 लाखांहून अधिक परतावा मिळाला आहे. मागील वर्षी GKP प्रिंटिंग आणि पॅकेजिंगचे शेअर्स 26.70 रुपये वर ट्रेड करत होते. 18 जुलै 2022 रोजी BSE वर GKP प्रिंटिंग शेअर्सची ट्रेडिंग 221.55 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्षापूर्वी जीकेपी प्रिंटिंगच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर गुंतवणूकदाराला कंपनीचे 3745 शेअर्स मिळाले असते. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती, त्यामुळे एकूण शेअर्सची संख्या दुप्पट म्हणजेच 7490 झाली. 18 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 221.55 रुपयांवर बंद झाले आहेत, अशा परिस्थितीत कंपनीच्या शेअर्समध्ये केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 16.49 लाख रुपये झाली.

1 लाख रुपये  2 वर्षात 34 लाखांहून अधिक :
ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी बाजार पूर्ण कोसळला होता, आणि त्यावेळी GKP प्रिंटिंग आणि पॅकेजिंगचे शेअर 17 जुलै 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 12.85 रुपये वर ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवून प्रचंड गुंतवणुक केली आणि 18 जुलै 2022 रोजी म्हणजेच तब्बल 2 वर्षानंतर कंपनीचे शेअर्स BSE वर 221.55 रुपयांवर बंद झाले आहेत. जर तुम्ही 17 जुलै 2020 रोजी म्हणजेच कोरोना काळात GKP प्रिंटिंगच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला त्यावेळच्या किमतीनुसार मिळालेल्या शेअर ची एकूण संख्या 7782 शेअर्स असती. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बोनस शेअर्स (1:1 च्या प्रमाणात) दिले आहेत, त्यामुळे तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 15564 झाली असती. 18 जुलै 2022 रोजी GKP प्रिंटिंगचे शेअर्स 221.55 रुपयांवर बंद झाले.अशा परिस्थितीत कंपनीच्या शेअर्समध्ये केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 34.48 लाख रुपये झाली असती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Multibagger Stocks GKP Printing Share Price return on investment in 19 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x