Multibagger Stocks | अदानी शेअर्स सोडा! हे आहेत करोडपती करणारे 5 शेअर्स, मालामाल करणं थांबत नाही, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | तुम्ही शेअर मार्केटबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या असणार ज्यात, म्हंटले जाते की, या शेअरने एक लाखावर करोडो रुपये परतावा दिला, किंवा आणखी काही. मात्र सध्या शेअर बाजाराची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, परतावा तर सोडाच, गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही, याची देखील शक्यता कमी आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत, ज्यानी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. आज या लेखात आपण अशाच पाच शेअर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊ सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hindustan Foods Share Price | Tanla Platforms Share Price | KEI Industries Share Price | Jyoti Resins and Adhesives Share Price | Sadhana Nitro Chem Share Price)
हिंदुस्थान फूड्स :
हिंदुस्थान फूड्स कंपनीच्या शेअरने माहील 10 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 50 हजार टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या या कंपनीचे शेअर्स 588.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 390 पट अधिक परतावा कमावला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 3.9 कोटी रुपये झाले आहे. ही एक वैविध्यपूर्ण FMCG उत्पादक कंपनी आहे. कंपनीकडे मजबूत क्लायंट बेस असून त्यात HUL, Reckitt Benckiser, US Polo सारखे ग्राहक सामील आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 679.64 कोटी रुपये कमाई केली होती, तर त्यात कंपनीने 17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
तनला प्लँटफॉर्म लिमिटेड :
ही कंपनी मुख्यतः क्लाउड कम्युनिकेशन स्पेसमध्ये मूल्यवर्धित सेवा प्रदान करते. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 116.51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 26.3 टक्के कमी झाला आहे. कंपनीचा महसूल 1.7 टक्क्यांनी घसरून 869.63 कोटी रुपयेवर आला आहे. तर एकूण खर्च 730.69 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा EBITDA 25 टक्के वार्षिक घसरणीसह 151.3 कोटी रुपयेवर आला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा प्रदान करते. तनला प्लँटफॉर्म लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 12500 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. फेब्रुवारी 2013 मधे कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या या शेअरची किंमत 530 रुकाहे गेली आहे. मागील दहा वर्षात या स्टॉकने लोकांना 106 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे. याकाळात ज्या लोकांनी शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.06 कोटी रुपये झाले आहेत.
केईआय इंडस्ट्रीज :
केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात लोकांना 11900 टक्के परतावा मिळवून दिला आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 14 रुपयांवर ट्रेड करत होते. तर सध्या शेअरची किंमत 1677 रुपयांवर आली आहे. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 120 पट परतावा कमावून दिला आहे. यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांना 1.20 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
ज्योती रेजिन्स :
ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 49380 टक्के परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2.5 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र सध्या शेअरची किंमत 1237 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत शेअरने लोकांना 490 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने 1 लाख रुपयांवर लोकांना 4.90 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. ज्योती रेजिन्स कंपनी मुख्यतः सिंथेटिक वुड अॅडेसिव्हच्या उत्पादनाचा व्यवसाय करते.
साधना नायट्रो :
साधना नायट्रो कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना 23950 टक्के परतावा मिळवून दिला आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.50 रुपयांवर ट्रेड करत होते. सध्या शेअर 112.50 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 225 पट परतावा कमावला आहे. या स्टॉकने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.25 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. साधना नायट्रो केमिकल उद्योग करणारी कंपनी आहे, जी केमिकल इंटरमीडिएट्स, हेवी ऑरगॅनिक केमिकल्स, परफॉर्मन्स केमिकल्स आणि वायरलेस नेटवर्क उपकरणे आणि सेवा क्षेत्रात काम करते. कंपनी देशांतर्गत भागात विक्री आणि निर्यात व्यवसाय देखील करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks has given huge return in crore rupees check details on 11 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY