31 January 2025 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

Multibagger Stocks | होय! गेल्या 5 दिवसात या शेअर्सनी शेकड्यात बंपर परतावा दिला, स्टॉक खरेदीनंतर संयमातून आयुष्य बदलेल

Multibagger Stock

Multibagger Stocks | 16 डिसेंबर 2022 रोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. रिझव्‍‌र्ह बँकेने डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत व्याजदर 50 bps वाढ केल्यावर आणि महागाई नियंत्रणासाठी यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढीचे संकेत मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात पडझड पहायला मिळाली होती. एफएमसीजी, टेक आणि एमएनसी कंपन्याचे शेअर्स सर्वात जास्त पडले होते.

मागील आठवड्यात बहुतेक सर्व सेक्टर लाल निशाणीवर ट्रेड करत होते. बँक निफ्टीमध्ये ही एका आठवडाभरात 1 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 461 अंकाच्या घसरणी सह 61,338 अंकावर आणि निफ्टी-50 निर्देशांक 146 अंकांच्या घसरणीवरसह 18,269 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांकात ही एक टक्‍क्‍यांची जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांकात अर्धा टक्‍क्‍यांची पडझड पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजारात कमजोरी आणि अस्थिरता असूनही असे 5 स्टॉक आहेत, त्यांनी अवघ्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

यशराज कंटेनर्स :
यशराज कंटेनर्स ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 26.47 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअरची किंमत 74.94 टक्क्यांनी वधारली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 5 दिवसात 8.90 रुपये किमतीवरून 15.57 रुपयांवर गेली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.57 रुपयांवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच दिवसात ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 74.94 टक्के परताव्यासह 1.75 लाख रुपयेवर पोहचले आहे. आज या कंपनीचा शेअर 10 टक्के अप्पर सर्किट सह 17.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जोखीमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.

त्रावणकोर फर्टिलायझर्स अँड केमिकल्स :
त्रावणकोर फर्टिलायझर्स अँड केमिकल्स कंपनीच्या शेअर्स नी मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत एका आठवड्यात 158.25 रुपयांवरून वाढून 268.30 रुपयांवर पोहचली आहे. या शेअर्समधून गुंतवणूकदारांनी एका आठवड्यात 69.54 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 17,360.94 कोटी आहे. गेल्या 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सनी दिलेला 69.54 टक्के परतावा हा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. गेल्या शुक्रवारी हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 268.30 रुपयांवर बंद झाला होता, आज हा स्टॉक 272 रुपये किमतीच्या जवळपास ट्रेड करत आहे.

इंड बँक हाउसिंग :
इंड बँक हाऊसिंग कंपनीच्या शेअर्सनी मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक अवघ्या एका आठवड्यात 27.05 रुपयांवरून वाढून 43.55 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच या स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 61 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 43.55 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 43.55 रुपयांवर बंद झाला होता. आज हा स्टॉक 42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पलाश सिक्युरिटीज :
पलाश सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. या स्टॉकची किंमत एवढ्या एका आठवड्यात 90.20 रुपयांवरून वाढून 141.55 रुपयांवर गेली आहे. या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 56.93 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 144.49 कोटी रुपये आहे. मागील शुक्रवार ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 141.55 रुपयांवर बंद झाला होता. आज हा स्टॉक 151.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

UCO बँक :
युको बँकेच्या शेअरनेही आपल्या शेअर धारकांना मागील आठवड्यात बंपर नफा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात या शेअरची किंमत 23.60 रुपयांवरून वाढून 36.40 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 54.24 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 43,519.69 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 2.39 टक्क्यांच्या वाढीसह 36.40 रुपयांवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक 34.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks has given huge returns in last week to shareholders on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x