Multibagger Stocks | फक्त 1 वर्षात या 5 शेअर्सनी भागधारकांचे पैसे केले दुप्पट, 298 टक्के परतावा दिला, स्टॉकची यादी सेव्ह करा
Multibagger Stocks| शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये उलथापालथ पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी या अस्थिर परिस्थितीमध्ये ही आपल्या भागधारकांना छप्पर फाड परतावा दिला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून शेअर बाजारात अस्थिरता आहे. एका वर्षात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकातील सेन्सेक्समध्ये फक्त 1.63 टक्के वाढ झाली आहे. बाजाराच्या या पडझडीमुळे अनेक बड्या कंपन्यांच्या शेअर्सना जबरदस्त हादरा बसला होता आणि शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तब्बल 50 टक्के पर्यंत घसरण झाली आहे. अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी अस्थिरतेत आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा दिला आहे. आज आपण या लेखात अशा 5 कंपन्यांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना 300 टक्के पर्यंत परतावा दिला आहे.
अदानी पॉवर :
अदानी पॉवरच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्सनी तब्बल 299 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी अदानी पॉवरचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 98 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर अदानी पॉवरचे शेअर्स 390.30 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले असते.
Tata Teleservices :
Tata Teleservices (Maharashtra) Limited म्हणजेच TTML कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना 280 टक्के परतावा मिळवून दिला आहे. TTML कंपनीचे शेअर्स 6 सप्टेंबर 2021 रोजी BSE वर 34.90 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसईवर 132.60 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.80 लाख रुपये झाले असते.
एल्गी इक्विपमेंट्स :
एल्गी इक्विपमेंट्सच्या शेअर्सने मागील एका वर्षात तब्बल 173.टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 198 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 539.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.72 लाख रुपये झाले असते.
अदानी टोटल गॅस :
अदानी टोटल गॅसच्या शेअर्सनी मागील एका वर्षात तब्बल 152 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात अदानी टोटल गॅसचे शेअर्स 1396.55 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 3525.35 रुपये किमतीवर जाऊन बंद झाले होते. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक होल्ड केली असती तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 2.52 लाख रुपये झाले असते.
दीपक फर्टिलायझर्स :
दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्सच्या शेअर्स नी आपल्या भागधारकांना मागील एका वर्षात तब्बल 112 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दीपक फर्टिलायझर्सचे शेअर्स 6 सप्टेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 418.55 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. दीपक फर्टिलायझर्सचे शेअर्स 5 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर 887.05 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणूक मूल्य 2.12 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks has given huge returns in short term to shareholders on 6 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा