23 November 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | बाब्बो! हे 5 मल्टीबॅगर शेअर्स श्रीमंत करत आहेत, 1 महिन्यात 200 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा

Multibagger Stock

Multibagger Stocks | भारतातील सर्व लोक शेअर बाजारात पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मागील एका महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये वाढ झाली होती आणि बाजार 400 अंकांनी वाढला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञ अनेकदा गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीबद्दल संशोधन करण्याचा आणि माहिती मिळवण्याचा सल्ला देतात. सध्या स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर शेअर्स आहेत ज्यांनी अल्प गुंतवणूकीत भरघोस परतावा कमवून दिला आहे.

आज या लेखात आपण अशा शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्क्यांनी वाढवले आहे. तुम्हीही या मल्टीबॅगर शेअर्समध्ये पैसे लावून मालामाल होऊ शकता.

1) वेल्टरमॅन इंटरनॅशनल लिमिटेड :
वेल्टरमॅन इंटरनॅशनल लि. या लेदर वस्तूंची उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 164 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई निर्देशांकावर 12.63 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 33.30 रुपये किमतीवर पोहोचते होते. अशा परिस्थितीत फक्त एका महिन्याच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 164 टक्क्यांनी वधारली आहे.

2) Alstone Textiles :
Alstone Textiles Ltd कंपनीच्याचे नाव मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत समाविष्ट आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किमत मागील एका महिन्याच्या अल्प कालावधीत 164 टक्के वाढली आहे. दिल्ली मध्ये स्थित असलेल्या या कंपनीचे शेअर्स गेल्या महिन्याच्या 3 तारखेला 66.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या शेअरची किंमत वाढून 175.90 रुपये झाली आहे.

3) K&R Rail Engineering:
K&R Rail Engineering कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. एका महिन्याच्या कालावधीत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 200 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 26.55 रुपयांवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्स 79.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च किंमत पातळीवर क्लोज झाले होते.

4) शारदा प्रोटीन्स :
शारदा प्रोटीन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त एका महिन्याच्या कालावधीत 165 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, या कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर 2022 रोजी 98.45 रुपयांवर ट्रेड करत होते. आता स्टॉक 260.05 पर्यंत वाढला आहे. तज्ञांनी या शेअरमध्ये दुप्पट वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

5) गुजरात टूलरूम :
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 162 टक्के वाढली आहे. मागील महिन्यात 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे, काल हे शेअर 74.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा परिस्थितीत, केवळ एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks has given huge returns in short time on 06 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x