16 November 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News
x

Multibagger Stocks | या शेअरने 631 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला, स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल झाले

Multibagger stocks

Multibagger Stocks | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांचे निर्गमन सुरू आहे. गुंतवणूकीचे देशातून बाहेर जाणे, सततची विक्री आणि नकारात्मक वाढ , अचानक सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झालेली तीव्र वाढ, वाढती महागाई, आणि जागतिक मध्यवर्ती बँकांचे कठोर आर्थिक धोरण यासर्व नकारात्मक गोष्टीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे आणि त्यामुळे २०२२ च्या सहामाही काळात शेअर बाजाराने निराशाजनक कामगिरी केली आहे.

मल्टीबॅगर स्टॉक चा परतावा :
मागील काही तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी जबरदस्त विक्री करून आपली गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घ्यायला सुरुवात केली. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले आणि पश्चिमी देशांचा त्यात वाढता सक्रिय सहभाग आणि त्याचे परिणाम हे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण करत आहेत. महागाई प्रचंड प्रमाणत वाढली आहे. वस्तूंच्या किमतीत तीव्र वाढ झाली असून, लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आणि जागतिक मध्यवर्ती बँकेने कठोर आर्थिक धोरण जाहीर केल्यामुळे भारतीय शेअर बाजाराने 2022 च्या सहामाहित निराशाजनक प्रदर्शन केले आहे. तरीही, काही स्टॉक असे आहेत ज्यात गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी मोठा परतावा मिळवला आहे. मंदीच्या भीतीने देशांतर्गत बाजार कमजोर स्थितीत व्यापार करत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. मार्केट मध्ये एक कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनी जेन्सॉल इंजिनिअरिंग हा असाच स्टॉक आहे जो सतत सकारात्मक परतावा देत आला आहे. शुक्रवारी ह्या स्टॉक मध्ये 5% ची वाढ झाली होती, आणि BSE वर दिवसा अखेर हा स्टॉक 870.80 रुपये वर बंद झाला.

सात महिन्यांत मालामाल : 
2022 या वर्षात, जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 534% परतावा दिला आहे. 3 जानेवारी रोजी हा स्टॉक 119.15 रुपयेवर ट्रेड करत होता आणि 22 जुलै रोजी स्टॉक 870.80 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. म्हणजेच यात पैसे गुंतवणाऱ्यांना मागील सात महिन्यांत 7.31 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. याउलट, बीएसई सेन्सेक्समध्ये एका वर्षात 7.5% ची घसरण नोंदवली गेली. ह्या स्टॉक मध्ये मागील आठवड्यात अप्पर सर्किट लागला होता.

एका वर्षात दिलेला परतावा :
जेंसोल इंजिनिअरिंग च्या शेअरची किंमत 18 ऑगस्ट 2021 रोजी 50.78 रुपये च्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकीवरून प्रचंड वाढला आणि सध्या हा स्टॉक ने 1,380% परतावा दिला आहे. मायक्रोकॅप स्टॉक मध्ये गेल्या पाच सत्रांत 23.47% ची वाढ झाली आहे आणि महील एका महिन्यात 50.22% वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 1,490.50% परतावा दिला आहे. त्याच वेळी, फक्त सहा महिन्यांच्या काळात हा स्टॉक 645.23% वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks has given huge returns to investors on 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x