19 April 2025 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | पडझडीच्या वातावरणात हे 5 स्टॉक 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत, हे जॅकपॉट शेअर्स सेव्ह करा

Multibagger stocks

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारतील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2022 या सालात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली आहे. या वर्षात आतापर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्सने जवळपास 6 टक्क्यांची नकारात्मक वाढ दाखवली आहे. त्याच वेळी, लघु भांडवल स्टॉक मध्ये 10 टक्के आणि मध्यम भांडवल स्टॉकमध्ये 6.50 टक्क्यांची पडझड झाली आहे. तज्ञांच्या मते, बाजारात स्टॉकवर विक्रीचा प्रचंड दबाव असताना या टप्प्यातही असे काही स्टॉक आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अश्या 5 स्टॉक्सबद्दल माहिती घेऊ.

सोनल अॅडेसिव्ह्स :
2022 च्या सुरुवातीला हा स्टॉक 9.80 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन हा स्टॉक आता 50.70 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 415 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 30 कोटी रुपये आहे. सोमवारी, हा स्टॉक दिवसाची उच्चांक पातळी गाठून त्याला अपर सर्किट लागला होता आणि स्टॉकने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे.

वीसीयु डेटा मॅनेजमेंट :
या कंपनीचे शेअर्सची किंमत 10.46 रुपयांवर होती. आता हा स्टॉक 61.90 रुपयांपर्यंत वधारला आहे. या स्टॉक ने आजपर्यंत जवळपास 500 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 95 कोटी रुपये असून त्याची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 65.20 रुपयांवर आहे. सोमवारी या शेअरने दिवसातील नीचांक पातळी गाठली होती आणि त्यात लॉवर सर्किट लागला होता.

एबीसी गॅस :
संपूर्ण वर्षाच्या आकडेवारीनुसार स्टॉकमध्ये 13 रुपयांची वाढ होऊन हा 39.75 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या कालावधीत स्टॉकने गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ह्या कंपनीचे बाजार भांडवल फक्त 7 कोटी असून 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 39.75 रुपये आहे, जी सोमवारी अप्पर सर्किटपर्यंत पोहोचली होती.

रिस्पॉन्स इन्फॉर्मेटिक्स :
ही एक लघु भांडवल कंपनी असून,2022 मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 285 टक्के परतावा मिळवून दिला होता. या शेअरची किंमत 12.96 रुपये होती. आता ती किंमत 50.05 रुपयांपर्यंत वाढली आहे. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर देखील ट्रेड करत आहे. सोमवारी या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. कंपनीचे बाजार भांडवल 32 कोटी रुपये आहे.

ध्रुव कॅपिटल :
या वर्षी 2022 च्या सुरुवातीपासून हा स्टॉक 4.54 रुपयांवर ट्रेड करत होता आणि त्यात जबरदस्त वाढ होऊन त्याची किंमत आता 24.10 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 430 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7 कोटी रुपये आहे, त्लघु भांडवल श्रेणीतील कंपनी असल्यामुळे गुंतवणुकीतील जोखीम देखील खूप जास्त आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 24.10 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks list has given huge returns to investors on 18 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या