Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपयांचा परतावा मिळाला

Multibagger Stocks | शेअर बाजारात ट्रेडिंग करून अनेक लोक श्रीमंत झालेली आपण पाहिले असणार. योग्य पद्धतीने स्टॉकची ओळख करून गुंतवणूक केली तर तुम्हीही करोडपती होऊ शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे संयम असला पाहिजे. आज आपण ज्या शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही काळात बंपर परतावा देऊन करोडपती केले आहे.
मल्टीबॅगर स्टॉक :
आज या लेखात आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, तो आहे, 3M कंपनीचा. 3M India कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत मजबूत परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 10,772.57 टक्केचा घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. 3M कंपनीचे बाजार भांडवल सध्या 26,945.65 कोटी रुपये असून, ही एक लार्ज-कॅप कंपनी आहे. व्हॅल्यू रिसर्च डेटानुसार, 3M इंडिया लिमिटेड कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
3M India च्या शेअर किंमतीचा इतिहास :
BSE निर्देशांकावर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3M India चे शेअर्स प्रति शेअर 23,919.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर्स 22,890.10 रुपये या मागील क्लोजिंग प्राइजच्या तुलनेत 4.50 टक्के जास्त होते. 11 जुलै 1997 रोजी हा स्टॉक 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत 23,919.65 रुपये या बाजारभावावर पोहोचली आहे. म्हणजेच, या कालावधीत कंपनीने आपल्या भागधारकांना 10,772.57 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 25 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये फक्त 1 लाख गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.08 कोटी रुपये झाले असते.
शेअर्सची मागील काळातील वाटचाल :
मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये सुमारे 64.12 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी स्टॉक मध्ये थोडी पडझड पाहायला मिळाली होती, स्टॉक त्यावेळी 4.72 टक्क्यांनी घसरला होता. 2022 मध्ये स्टॉकच्या किमतीत 7.30 टक्के वर्ष-दर-वर्ष प्रमाणे घट पाहायला मिळाली होती. या स्टॉकने 08 नोव्हेंबर 2021 रोजी 27,800.00 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकी किमतीला स्पर्श केला आहे. 27 मे 2022 रोजी BSE निर्देशांकावर रोजी स्टॉक मध्ये पडझड झाली, आणि शेअर्स 17,300.00 रुपये या आपल्या 52-आठवड्यांच्या नीचांकी पातळी किमतीवर पोहोचले होते. म्हणजेच, सध्याच्या बाजारभावानुसार, स्टॉक आपल्या उच्चांक पातळी किंमतीपेक्षा 13.95 टक्के खाली आणि नीचांक पातळी किमतीच्या 38.26 टक्के वर ट्रेड करत आहे. मागील ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत होता.
कंपनी व्यवसाय सविस्तर :
3M इंडिया लिमिटेड कंपनी वैविध्यपूर्ण उद्योग करते. अॅब्रेसिव्ह, अॅडेसिव्ह, सीलंट आणि फिलर्स, प्रगत साहित्य, ऑटोमोटिव्ह पार्ट्स आणि हार्डवेअर, बिल्डिंग सप्लाय, क्लीनिंग सप्लाय, कोटिंग्स, कंपाऊंड्स आणि पॉलिश, डेंटल आणि ऑर्थोडोंटिक्स, प्रयोगशाळा वस्तू पुरवठा आणि टेस्टिंग, लेबल्स, स्नेहक, पर्सनल प्रोडक्ट्स, ऑफिस प्रोटेक्शन या प्रकारचे उत्पादन 3M India Limited द्वारे उत्पादित केले जातात. सोबतच कंपनीच्या उत्पादनात Signage & Marking, Tape & Tool Manufacturing यांचा देखील समावेश होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of 3M India Share Price return on 19 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL