27 January 2025 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

Multibagger Stocks | होय! 56000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा देणारा अमारा राजा बॅटरीज शेअर तेजीत, तेजीचा फायदा घेणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | अमारा राजा बॅटरीज या भारतातील दिग्गज लीड अॅसिड बॅटरी निर्मात्या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 6.80 टक्के वाढले आहेत. केवळ अल्पावधीत नाही तर, दीर्घ काळात देखील या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. मागील 19 वर्षात अमारा राजा बॅटरीज कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना 56,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. (Amara Raja Batteries Share Price)

भारतीय ब्रोकरेज फर्मच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. सध्याच्या किंमत पातळीवरून हा स्टॉक 20 टक्के अधिक वाढू शकतो. शुक्रवारी हा स्टॉक 634.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी अमारा राजा बॅटरीज कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 645.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Amara Raja Share Price)

56000 वर एक कोटी परतावा – (Amara Raja Batteries Share)

अमारा राजा बॅटरीज कंपनीचे शेअर्स 18 जून 2004 रोजी 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर हा स्टॉक 18036 टक्क्यांनी वाढून 645.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 19 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी अमारा राजा बॅटरीज स्टॉक लवर 56000 रुपये लावले होते, असे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. 23 जून 2022 रोजी अमारा राजा बॅटरीज कंपनीचे शेअर्स 449.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अवघ्या 6 महिन्यांत म्हणजेच 9 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 669.95 रुपये हा आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात

अमारा राजा बॅटरीज ही कंपनी भारतातील लीड ॲसिड बॅटरी बनवणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. अमारा राजा बॅटरीज कंपनी भारतातील 70 टक्के गाड्यांसाठी बॅटरी पुरवठा करण्याचे काम करते. ही कंपनी वाहनांसोबत इतर उद्योगांसाठी देखील बॅटरी बनवण्याचे काम करते.

ब्रोकरेज फर्म जिओजितच्या तज्ज्ञांच्या मते ऑटो सेक्टर पुढील काळात चागली कामगिरी करताना पाहायला मिळेल. तसेच अमारा राजा बॅटरीज कंपनीच्या व्यवसायाला चालना मिळेल. अमारा राजा बॅटरीज दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या बॅटरीसाठी लिथियम बॅटरी देखील बनवते.

मार्च 2023 तिमाहीमध्ये कंपनीने चांगली कामगिरी केली होती. कंपनीच्या महसुल संकलनात वार्षिक 11 टक्के वाढ पहायला मिळाली आहे. पुढील काळात कंपनीच्या महसुलात आणखी मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. अमारा राजा बॅटरीज कंपनी लिथियम आयन प्रकल्प स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या सर्व बाबींचा विचार करून ब्रोकरेज फर्मने 762 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Amara raja batteries Stock price on 26 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x