17 April 2025 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

Multibagger Stocks | या शेअरमध्ये 58 दिवसापासून अप्पर सर्किट, 3 महिन्यांत 1500 टक्के परतावा, हा स्टॉक नोट करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून देणाऱ्या अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे शेअर्स सातत्याने वाढताना दिसत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर ह्या स्टॉकमध्ये 5 टक्क्याचा अप्पर सर्किट लागला आणि शेअरची किंमत 730 रुपयांवर गेली होती. सध्या अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे शेअर्स आपल्या सर्वकालीन किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. सलग 58 व्या दिवशी स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. मागील तीन महिन्यांत या खाद्यतेल कंपनीचा स्टॉक 45 रुपयांच्या किमतीवरून 730 रुपये किमतीवर जाऊन ट्रेड करत आहेत. अवघ्या तीन महिन्यांत अंबर प्रोटीन ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. या वाढीच्या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्स मध्ये याच कालावधीत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीचा व्यवसाय सविस्तर :
31 डिसेंबर 1992 रोजी अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजची स्थापना खाद्य/अखाद्य तेल आणि ‘डी’ ऑइल उत्पादन करण्याच्या हेतूने करण्यात आली होती. सध्या कंपनी खाद्य तेलासह कापसाच्या शेड शुद्धीकरणाच्या व्यवसायात गुंतलेली असून पुनर्विक्री व्यवसाय, रिफाइंड कॉटनसीड ग्राउंडनट ऑईल, रिफाइंड सनफ्लॉवर रिफाइंड मक्याचे तेल आणि सोयाबीन तेल खरेदी आणि पॅक करण्याचा व्यवसाय करते. सध्या अंबर प्रोटीन्स कंपनी ‘एक्सटी’ ग्रुप अंतर्गत आपल्या व्यापार करते. BSE निर्देशांकावर एक्सटी ग्रुपचे सर्व स्टॉक सूचीबद्ध असून, हे सर्व स्टॉक ट्रेड-टू-ट्रेड तत्त्वावर व्यापार करत आहेत. या कंपन्यांचे बाजार भांडवल खूप कमी आहेत.

शेअर्स होल्डिंग पॅटर्न :
30 जून 2022 पर्यंत अंबर प्रोटीन्स च्या प्रमोटर्सकडे एकूण 74.97 टक्के वाटा आहे. आणि अंबर प्रोटीन्सचा इक्विटी बेस खूप कमी आहे. त्यामुळे प्रमोटर्स फक्त 74.97 टक्के शेअर्स होल्ड करत आहेत. कंपनीच्या किरकोळ भागधारकाकडे 25.03 टक्के शेअर्स होल्ड आहेत. आणि इतर गुंतवणूक संस्था आणि गुंतवणूकदारांकडे 0.61 टक्के शेअर्स होल्ड आहेत.

कंपनीचे उत्पादन :
अंबर प्रोटीन्सने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये त्यांच्या ऑईल रिफायनरी केंद्रात 21,239.96 मेट्रिक टन तेल शुद्धिकरण केले आहेत. मागील वर्षी कंपनीचे तेल उत्पादन 27,457.91 मेट्रिक टन होते. अंबर प्रोटीन्स कंपनीने 2,134.92 मेट्रिक टन रिफाइंड शेंगदाणा तेल, शुद्ध सूर्यफूल तेल, रिफाइंड कॉर्न ऑइल, मोहरीचे तेल आणि सोयाबीन तेल पुन्हा विक्री करण्यासाठी खरेदी केले आहे आणि त्याचे पॅकेजिंग केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Amber Protein industry limited share price return on investment on 24 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या