27 January 2025 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
x

Multibagger Stocks | या 47 रुपयाच्या शेअरने आधीच मालामाल केलंय, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात जबरदस्त पडझड सुरू असताना Atam Valves Ltd नावाच्या एका स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आणि रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 270.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 468.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात स्टॉकची किंमत 47 रुपयांवरून सर्वकालीन उच्चांक किंमतीवर गेली आहे.

बोनस शेअरवर कंपनीचे मत :
Atam Valves Ltd कंपनीने आपल्या SEBI फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, “भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड रेग्युलेशन, 2015 च्या नियमन 42 नुसार, सूचित केले जाते की कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख 12 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे”. 30 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स मान्यतेचा निर्णय भागधारकांच्या स्विकृतीसाठी ठेवला आहे. Atam Valves कंपनीचे बाजार भांडवल 111.42 कोटी आहे. ही एक प्लंबिंग आणि इंडस्ट्रियल व्हॉल्व्ह आणि फिटिंगचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे.

Atam Valves Ltd शेअरचा इतिहास :
9 ऑक्टोबर 2020 रोजी Atam Valves कंपनीचा स्टॉक 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील दोन वर्षांत शेअरची किंमत सध्याच्या सर्वकालीन उच्चांक बाजारभावापर्यंत पोहोचली आहे. या कालावधीत ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 575.25 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 1 ऑक्टोबर 2021 रोजी या स्टॉकची किंमत 51.50 रुपये होती, जी गेल्या एका वर्षात वाढून सध्याच्या 270.10 रुपये किंमतपर्यंत पोहोचली आहे. गेल्या एक वर्षात ह्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना 424.47 टक्केचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2022 या चालू वर्षांत शेअरने आतापर्यंत 468.63 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे.

1 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 116 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 270.10 रुपये किमतीवर गेला आहे. म्हणजेच फक्त सहा महिन्यात स्टॉकमध्ये 132.84 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि, मागील 1 महिन्यात स्टॉकमध्ये 20.56 टक्के आणि गेल्या 5 ट्रेडिंग सेशन मध्ये स्टॉक 13.71 टक्के खाली आला आहे. हा स्टॉक 10.12 च्या P/B आणि 79.59 च्या PE गुणोत्तर प्रमाणे ट्रेड करत आहे. Atam Valves Ltd आपले प्रतिस्पर्धी एक्साइड इंडस्ट्रीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, मदरसन वायरिंग, यूनो मिंडा, बॉश आणि संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड सारख्या कंपनीच्या तुलनेत चांगले प्रदर्शन करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Atam Valves Ltd share price return on investment 03 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x