25 December 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
x

Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाखाचे केले 45 लाख, 4 महिन्यांत दिला 4000 टक्के परतावा, स्टॉक नेम सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks| शेअर बाजारात इतर वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये खूप कमी IPO बाजारात आले. काही IPO खूप चांगले होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता, पण पण काही IPO असे होते ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. केवळ आयपीओच नाही तर जुन्या आणि मोठ्या शेअर्सनेही काही खास परतावा दिला नाही. वास्तविक, 2022वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजाराची घसरण सुरू झाली होती जी अजूनही चालूच आहे. शेअर बाजारात अजूनही कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. मागील 1-2 महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांच्या परती मुले थोडीफार तेजी दिसत होती, पण आता ती तेजीही जाताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा शेअर बाजारात परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, असे काही शेअर्स आहेत, जे बाजारातील या पडझडीला अपवाद आहेत. ह्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करून लोकांनी कडक नफा कमावला आहे. असाच एक शेअर म्हणजे “बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन लिमिटेड”.

“Badoda Rayon corporation Limited” ही कंपनी 2022 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध झाली होती. मागील 6 महिन्यात BSE निर्देशांकात 5.25 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. BRCL या कंपनीने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 5 टक्के वाढीसह 212.30 रुपये किमतीवर बंद झाला होता. हा स्टॉक 1 जून 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हा त्याची ओपनिंग किमाग 4.64 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत ह्या स्टॉक ने एकूण 4475 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे.

1 लाखावर दिला 45 लाख रुपये परतावा :
जर तुम्ही या स्टॉकमध्ये ओपनिंगच्या दिवशी 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणुक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 45.75 लाख रुपये झाले असते. म्हणजेच फक्त 5 महिन्यांत तुम्ही 44 लाख रुपयांहून अधिक नफा कमावला असता. एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, सध्या त्यात वाढ होऊन किंमत 212 रुपयांपर्यंत गेली आहे. शेअर बाजारात अस्थिरता असताना ही ह्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 164 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर एक महिन्याभरापूर्वीही तुम्ही या कंपनीत 1 लाख रुपये लावले असते तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.64 लाख रुपये झाले असते.

कंपनीचा तपशील थोडक्यात :
Badoda Rayon corporation Limited” कंपनीचे मुख्यालय गुजरात मध्ये आहे. ही कंपनी कापड निर्मिती उद्योगात कार्यरत आहे. कंपनीचे प्रमोटर संग्रामसिंह गायकवाड आहेत, जे पूर्वीच्या बडोदा राजघराण्याचे वारस आहेत. ह्या कंपनीची सुरुवात 1958 साली बडोद्याचे माजी महाराज फतेहसिंगराव गायकवाड यांनी केली होती. महाराजांच्या मृत्यूनंतर या कंपनीची धुरा संग्राम सिंह गायकवाड यांच्या हाती आली. सध्या त्यांचा मुलगा प्रतापसिंह गायकवाड कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहत आहेत. ही कंपनी मुख्यतः व्हिस्कोस फिलामेंट रेयॉन यार्न, सल्फ्यूरिक ऍसिड, कार्बन डाय-सल्फाइड, सोडियम सल्फेट, नायलॉन यार्न इत्यादी निर्मिती उद्योगात व्यापार करते. कंपनीचे बाजार भांडवल 486 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Badoda Rayon Corporation limited share price return on investment on 3 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x