21 April 2025 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Multibagger Stocks | होय! या शेअरने फक्त 5 महिन्यांत पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखावर 57 लाखांचा परतावा, खरेदी करावा?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सोमवारच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. त्यावेळी या कंपनीच्या शेअरची किंमत 266.05 रुपये प्रति शेअर होती. आशावादी धोरण आणि कापड उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी भारत सरकारची वचनबद्धता यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक मल्टीबॅगर स्टॉक निर्माण झाले आहेत. अपवादात्मक कामगिरीमुळे, बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन निर्विवादपणे शेअर मार्केट मधील ‘मल्टीबॅगर्स स्टॉकचा राजा’ म्हणून ओळखला जातो.

बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन
सोमवारचा इंट्राडे सेशनमध्ये बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE वर 266.05 रुपये प्रति शेअर या किमतीवर 5 टक्केच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सने बॅक-टू-बॅक अप्पर सर्किटला स्पर्श करून पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5,633 टक्के वाढ नोंदवली आहे. याचा अर्थ या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 57 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. ही कंपनी सूरत गुजरात येथे वस्त्रोद्योग व्यवसायात गुंतलेली आहे. गुजरात मधील सुरत हे शहर मुळात कापड व्यवसायासाठी जगभरात प्रसिद्ध मानले जाते. सुरत मध्ये व्हिस्कोस फिलामेंट यार्न, नायलॉन धागे, पॉलिस्टर धागे आणि इतर उपउत्पादनांच्या निर्मिती आणि विक्री मोठ्या प्रमाणात होते.

भारतीय वस्त्रोद्योगात फायबर आणि धाग्यापासून ते फॅब्रिकपर्यंतचे सर्व उत्पादन घेण्याचे सामर्थ्य आहे. भारतात कच्च्या मालाची विपुलता, संपूर्ण मूल्य साखळींची उपस्थिती, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि वाढत्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठा हे सर्व घटक भारतातली कापड उद्योगासाठी पोषक आहे. कापूस शेतीसाठी लागणारे क्षेत्र भारतात उपलब्ध आहे. आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि कापूस उत्पादक देश आहे. भारत देश पॉलिस्टर, रेशीम आणि फायबरचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. याशिवाय, शेती नंतर भारतात वस्त्रोद्योग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग ठरला आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 12,382 कोटी रुपयांचा फंड
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 च्या आकडेवारीनुसार भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 12,382 कोटी रुपयांचा फंड जाहीर केला आहे. आणि स्वयंचलित मार्गाने या क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला/FDI ला परवानगी देण्यात आली आहे. वस्त्रो उद्योग क्षेत्राचा दीर्घकालीन आशावादी दृष्टीकोन आणि बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीची भविष्यातील वाढीची क्षमता विचारत घेऊन या स्टॉकवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Baroda Rayon Corporation share price return on investment on 02 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या