23 November 2024 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

Multibagger Stocks | असा शेअर कोणाच्या हाताला लागला का?, फक्त 25 हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोत परतावा मिळला, संयमातून चमत्कार

Multibagger Stock

Multibagger Stocks | डेव्हिस लॅब कंपनीने मागील 5 वर्षात आपल्या भागधारकांना घसघशीत असा 323 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. याचा अर्थ असा की जर आपण 5 वर्षांपूर्वी डेव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, तर आज आपले गुंतवणूक मूल्य 4.23 लाख रुपये झाले असते.

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या काही हजारांची गुंतवणूक करून भागधारकांना करोडो रुपयांचा परतावा मिळवून देतात. डेव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीची गणना भारतातील फार्मा उद्योगातील दिग्गज कंपनीच्या गटात होते. डेव्हिस लॅब लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स कंपनी आहे, जीचा व्यापार अनेक देशात विस्तारलेला आहे. मागील दोन दशकात या कंपनीच्या शेअरमध्ये अवघ्या काही हजार रुपयांची गुंतवणूक करून लोकांनी करोडो रुपये नफा कमावला आहे. डेव्हिस लॅब ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स म्हणजेच एपीआय आणि इंटरमीडिएट्सच्या उत्पादन उद्योगात सक्रिय आहे. ज्या भागधारकांनी 19 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांची संपत्ती आता 408 पटीने वाढली आहे.

या फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून दिला आहे. 12 सप्टेंबर रोजी डेव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2.11 टक्क्यांची वाढ झाली होती. शेअरची त्यावेळी 3679 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर शेअर लाल निशाण वरच बंद झाले होते. 13 मार्च 2003 रोजी डेव्हिस लॅब कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट झाले होते, तेव्हा त्याची ट्रेडिंग किंमत फक्त 9 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 40,777.78 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे.

मागील 5 वर्षात 323 टक्के कमाई :
डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षात आपल्या भागधारकांच्या पैशात 323 टक्के परताव्याची घातली आहे. याचा अर्थ असा होतो की, जर आपण 5 वर्षांपूर्वी डेव्हिस लॅबच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य 1 लाख रुपयेवरून 4.23 लाख रुपये झाले असते.

डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात 1.42 टक्क्यांची घसरण झाली होती. या स्टॉकच्या मागील काही काळातील कामगिरीबद्दल माहिती घेतल्यास असे कळते की, मागील महिन्यात शेअर मध्ये अस्थिरता दिसून आली होती, त्यामुळे शेअर्सच्या किमतीमध्ये 1.42 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले होते. त्याचवेळी, स्टॉकच्या मागील एका वर्षाच्या वाटचालीवर नजर टाकल्यास असे दिसेल की, स्टॉकची किंमत 27.65 टक्क्यांनी पडली आहे.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
आपण एक उदाहरण घेऊन ह्या स्टॉक मधून मिळणाऱ्या परताव्याची माहिती घेऊ. जर तुम्ही 13 मार्च 2003 रोजी डेव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 4 कोटी 8 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही 13 मार्च 2003 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही 25 हजार रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 1.02 कोटी झाले असते, आणि तुम्ही करोडपती झाला असता.

कंपनी बद्दल सविस्तर:
डेव्हिस लॅब ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे स्थित आहे. डेव्हिस लॅब कंपनीचा समवेश लार्ज कॅप गटात होत कंपनीचे एकूण बाजार भांडवल 97.65 हजार कोटी आहे. डेव्हिस लॅब कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक निर्मितीच्या व्यवसायात सक्रिय आहे. याशिवाय, डेव्हिस लॅब आपली उपकंपनी Divi’s Nutraceuticals द्वारे न्यूट्रास्युटिकल घटकांचे देखील उत्पादन आणि वितरण करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Devi’s laboratory limited share price return on 17 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)Devi's lab(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x