29 January 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

Multibagger Stocks | अल्पावधीत 925% परतावा देणारा शेअर पुन्हा बंपर परतावा देणार, दिग्गजांनी खरेदी केले शेअर्स

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. साध्य जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही, धाबरिया पॉलिवुड कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल यांनीही गुंतवणूक केली आहे. ( धाबरिया पॉलिवुड कंपनी अंश )

4 एप्रिल रोजी धाबरिया पॉलिवुड कंपनीचे शेअर्स 1.76 टक्क्यांच्या वाढीसह 300.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 325.49 कोटी रुपये आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 428 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 108.05 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी धाबरिया पॉलिवुड स्टॉक 1.89 टक्के घसरणीसह 295 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्याकडे डिसेंबर तिमाहीत धाबरिया पॉलिवुड कंपनीचे 6,96,178 शेअर्स होते. याचे एकूण भाग भांडवालाशी प्रमाण 6.43 टक्के आहेत. मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये धाबरिया पॉलिवुड कंपनीचे 416500 शेअर्स म्हणजेच 3.85 टक्के भाग भांडवल आहेत. नुकताच धाबरिया पॉलिवुड कंपनीला 9.26 कोटी रुपये मूल्याच्या 2 ऑर्डर मिळाल्या होत्या.

धाबरिया पॉलिवुड कंपनीला UPVC खिडक्या आणि दरवाजे पुरवठा करण्यासाठी रेडियंस रियल्टी ग्रुपने 5.66 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरची पूर्तता पुढील 12 महिन्यांत करायची आहे. यासह धाबरिया पॉलिवुड कंपनीला वॉर्डरोबचा पुरवठा करण्यासाठी M3M ग्रुपने 3.60 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

डिसेंबर तिमाहीत धाबरिया पॉलिवुड कंपनीने 29.5 टक्क्यांच्या वाढीसह 52.02 कोटी रुपयेची निव्वळ विक्री नोंदवली होती. तर याच तिमाहीत कंपनीने 48 टक्क्यांच्या वाढीसह 3.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचा ऑपरेटिंग नफा 87.4 टक्क्यांच्या वाढीसह 10.88 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 52.09 टक्क्यांच्या वाढीसह 7.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

31 डिसेंबर 2023 पर्यंत धाबरिया पॉलिवुड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 100 कोटींपेक्षा जास्त होता. मागील एका महिन्यात धाबरिया पॉलिवुड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे 2024 या वर्षात धाबरिया पॉलिवुड कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी घसरले होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 132 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 925 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Dhabriya Polywood Share Price 06 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x