16 November 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS
x

Multibgger Stocks | या स्टॉकने मागील केवळ 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला, स्टॉकबद्दल सविस्तर

Multibagger stock

Multibgger Stocks | मागील 3 महिन्यांत एक स्टॉक मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तो स्टॉक आहे अल्कॉन इंजिनिअरिंग. अल्कॉनचे शेअर्स तीन महिन्यांपूर्वी सुमारे 190 रुपयांवर ट्रेड करत होते आणि आता हा स्टॉक 344 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त असा घसघशीत परतावा दिला आहे.

अल्कॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स :
मागील तीन महिन्याचे निरीक्षण केले तर आपल्याला दिसेल की भांडवली वस्तू उद्योगातील कंपन्याच्या शेअर किमतीत बरीच वाढ झाली आहे. आणि ह्या कंपन्यानी जबरदस्त परतावा दिला आहे. मागील 3 महिन्यांत अल्कॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स सुमारे 190 रुपयांवरून 344 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर प्राईस मध्ये प्रचंड वाढ झाली असून गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, कॅपिटल गुड्स क्षेत्रातील आणखी एक कंपनी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचे शेअर्स 1850 रुपयांवर ट्रेड करत होते त्यात आज 3235 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. तर रोलेक्स रिंग्सचे शेअर्स तीन महिन्यांपूर्वी 1235 रुपयांवर ट्रेड करत होते ते आज 1745 रुपयांवर पोहोचले आहेत.

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांचे मत :
भांडवली वस्तूं क्षेत्रातील कंपनीच्या शेअर किमतीत प्रचंड वाढ झाली असल्याचे आपण पाहू शकतो. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांचे असे मत आहे की भांडवली वस्तूंची उपलब्धता सवलतीच्या दरात होती कारण गेल्या दोन वर्षांत कोरोना मुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला होता. पण, आता त्यांच्या कच्च्या मालात घट झाल्यामुळे आणि चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेमुळे गेल्या 2-3 महिन्यांत या स्टॉकमध्ये बरीच उलाढाल झाल्याचे दिसते. तथापि, अशा शेअर मध्ये आलेली तेजी एक ते दोन तिमाहीपेक्षा जास्त टिकणार नाही असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संधी मिळताच अल्पावधीत शेअर विकून बाहेर पडावे आणि नफा बुक करावा.

शेअर मध्ये मागील एका महिन्यात 14.6% वाढ :
बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स कंपनीचे शेअर मध्ये मागील एका महिन्यात 14.6% वाढ झाली आहे. ह्या कंपनीशी संबंधित अधिकारी म्हणतात की बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्सने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 14.6% परतावा दिला आहे. दुसरीकडे, निफ्टी निर्देशांकामध्ये मागील तीन महिन्याच्या कालावधीत केवळ 6.43% वाढ झाली आहे. भांडवली वस्तू क्षेत्रातील तेजी कायम असल्याचे कारण बाजार तळाच्या पातळीपासून सावरताना दिसत आहे पण तो तरीही अस्थिर असून सध्या गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते. निरीक्षण केले तर कॅपेक्स चक्र देखील पुनरुज्जीवित झालेले आपण पाहू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटीच्या किमती घसरल्याने कमोडिटी कंझ्युमर, सिमेंट, ऑटो आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रासाठी सकारात्मक बाब आहे. आणि त्यांच्या शेअर मध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे कंपनीचे अधिकारी म्हणाले.

गुंतवणूकदार थोडा विचार करून या कंपन्यांवर पैसे लावू शकतात पण जागतिक घडामोडी पहिल्या तर बाजार अजूनही अस्थिर आहे. आशिका ग्रुपचे तज्ज्ञ म्हणतात की भांडवली वस्तूंच्या क्षेत्रातील गुंतवणूकदार ए बी बी, सिमेन्स, कमिंनस, कारबोरांडोम युनिव्हर्सल, ग्राईंडवेल नॉर्टन यासारख्या कंपन्यांवर पैसे लावू शकता पण योग्य वेळी नफा बुक करण्याचा प्रयत्न केले तर अधिक चांगले. त्याचवेळी सोनम श्रीवास्तव म्हणतात की भांडवली वस्तू क्षेत्रात आम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एल अँड टी आणि भारत फोर्ज सारखे स्टॉक्स हे गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित वाटतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks of Elecon Engineering Company Share Price on 21 July 2022

 

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)Share price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x