5 November 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Multibagger Stocks | दिग्गजांच्या पोर्टफोलिओतील हा स्टॉक देतोय मजबूत परतावा, 1 लाखावर 63 लाखाचा परतावा, स्टॉक खरेदी करणार?

Multibagger Stock, Rakesh jhunjhunwala, Kubota, Share market, stock, BSE, NSE,

Multibagger Stocks | प्रसिद्ध दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली, ते शेअर्स सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेला असाच एक स्टॉक आहे,एस्कॉर्ट्स कुबोटा. आज या लेखात आपण कुबोटा या कृषी आणि बांधकाम यंत्रसामग्री बनवणाऱ्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत. कुबोटा कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या भागधारकांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी वाढ झाली आहे की, ते 33 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

झुनझुनवाला स्टॉक :
19 सप्टेंबर 2022 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटाचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर जाऊन पोहोचले होते. कंपनीच्या शेअर्सनी 2122.85 रुपयांचा सार्वकालीन उच्च बाजारभाव गाठला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2086.45 रुपये किमतीवर जाऊन पोहोचले होते. एस्कॉर्ट्स कुबोटा ह्या स्टॉकमध्ये बीग बूल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश राकेश झुनझुनवाला यांची देखील गुंतवणूक आहे.

ट्रेडिंग किंमत आणि परतावा :
5 डिसेंबर 2008 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर कुबोटाचे शेअर्स 32.85 रुपयेच्या किमतीवर ट्रेड करत होते. 19 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2086.45 रुपये किमतीवर जाऊन पोहोचले होते. एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 5 डिसेंबर 2008 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटाच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि आजपर्यंत ती होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणुकीचे मूल्य 63.51 लाख रुपये झाले असते. एस्कॉर्ट्स कुबोटाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1,400 रुपये होती.

शेअर्स बद्दल तज्ञांचे मत :
कुबोटा कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 2200 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. कंपनीच्या शेअर्सला 2040 रुपयांच्या जवळ मजबूत आधार मिळाला असून अल्पावधीत कंपनीचे शेअर्स 2200 रुपयांच्या पातळीपर्यंत जाताना दिसतील, असा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी एप्रिल-जून 2022 या तिमाहीत कुबोटा चे शेअर्स खरेदी केले होते. जून 2022 रोजी जाहीर झालेल्या तिमाहीत एस्कॉर्ट्स कुबोटाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मध्ये कुबोटा कंपनीचे 18,30,388 शेअर्स आहे. राकेश झुनझुनवाला यांची कंपनीतील हिस्सेदारी 1.39 टक्के आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Escorts Kubota share price return on 20 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x