28 April 2025 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 29 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 वर्षात 2700 टक्के परतावा, मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाखाचे 28 लाख रुपये झाले, गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stocks

Multibagger Stocks | Gensol Engineering Limited हा अश्या जबरदस्त शेअर्सपैकी एक आहे ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन श्रीमंत केले आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 2700 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

मागील काही महिने गुंतवणूकदारांसाठी अतिशय कठीण गेले होते. 2022 मध्ये शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र अश्या पडझडीच्या काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. Gensol Engineering Ltd हा अशा शेअर्सपैकी एक आहे, ज्याने मागच्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स तब्बल 2700 टक्क्यांहून अधिक वाढले होते. या वर्षी Gensol Engineering Limited ची कामगिरी कशी होती हे आपण पाहू.

24 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचा शेअर 53.63 रुपयेवर ट्रेड करत होता. आता एका शेअर ची किंमत 1548 रुपये झाली आहे. मागील एका वर्षात, कंपनीने बीएसईवर आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2758.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याचवेळी, या वर्षातील आतापर्यंतच्या शेअर्स च्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअरच्या किमतीत 1184.10 रुपयांची वाढ दिसून आली आहे. मागील 6 महिन्यांची शेअर्स ची कामगिरीही उत्साहवर्धक आहे. या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 554.83 टक्क्यांनी वाढ झाली होती. दरम्यान, एका शेअरची किंमत 233.65 रुपयांवरून 1548 रुपयांपर्यंत पोहोचली होती. मागील 1 महिन्याबद्दल बोलायचे झाले तर या काळातही गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. फक्त एक महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 67.34 टक्क्यांनी वाढली आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीवर परतावा :
तुम्ही जर ह्या स्टॉकवर पैसे लावले असते तर त्याचा परतावा म्हणून तुम्हाला1.69 लाख रुपये मिळाले असते. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्स वर विश्वास ठेवला होता, त्यांची एक लाख रुपयांची गुंतवणूक आता वाढून 6.62 लाख रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या पहिल्या दिवशी एक लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून आता 12.99 लाख रुपये मिळाले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी या समभागावर पैसे लावले होते आणि तो आतापर्यंत टिकवून ठेवले, अशा गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांवर परतावा म्हणून त्यांना 28.86 लाख रुपये मिळाले आहे. कंपनीने 18 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 2,300 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

कंपनी बद्दल सविस्तर : ही अहमदाबाद स्थित कंपनी असून तिच्या अभियांत्रिकी सेवासाठी ओळखली जाते. कंपनी सध्या स्वतःची इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी खूप चर्चेत आली आहे. कंपनीने म्हटले आहे की त्यांचे लक्ष्य हे लोकांना 6 लाख रुपयांमध्ये स्वस्त इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून देण्याचे आहे. कंपनीच्या शेअर्स ची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 53.63 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Gensol Engineering Limited share price return on 25 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)Gensol(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या