27 January 2025 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stocks | फक्त 1 शेअरवर 8 फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर खरेदीसाठी झुंबड

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गेल्या वर्षी बाजारात लिस्टेड एक स्मॉल कॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर बोनस देणार आहे. ही कंपनी म्हणजे ग्रेटॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 8: 1 या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच कंपनी लोकांना प्रत्येक 1 शेअरसाठी 8 बोनस शेअर्स देणार आहे. ग्रिटेक्स कॉर्पोरेट सेवा वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ग्रिटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचा आयपीओ आला होता. ही कंपनी 9 ऑगस्ट 2021 रोजी बीएसई एसएमईवर लिस्ट झाली होती.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर नाही – Gretex Corporate Services Stock Price :
ग्रेटॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यासह 90,98,760 इक्विटी शेअर्स जारी करेल, ज्याची किंमत 9,09,87,600 रुपये आहे. बोनस शेअरसाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. बोर्ड मंजुरीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत कंपनी बोनस शेअर्सचे क्रेडिट करेल. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे शेअर्स 2 सप्टेंबर 2022 रोजी 4.96 टक्क्यांनी वधारुन 274.30 रुपयांवर बंद झाले आहेत. कंपनीचे समभाग 52 आठवड्यांतील उच्चांकी 275 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

शेअर्सनी 5 महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला :
गेल्या 5 महिन्यात ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. ८ एप्रिल २०२२ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचे शेअर १७७.५० रुपयांवर होते. २ सप्टेंबर २०२२ रोजी बीएसई वर कंपनीचे शेअर २७४.३० रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सनी जवळपास 26 टक्के रिटर्न दिले आहेत. त्याचबरोबर गेल्या एका वर्षात ग्रिटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या शेअर्सनी 48 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न्स दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks of Gretex Corporate Services Share Price in Focus check details 05 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x