27 January 2025 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stocks | या शेअरने 85 टक्के परतावा दिला, हाच स्टॉक अजून तेजीत येतोय, बंपर कमाईसाठी स्टॉकचं नाव लक्षात ठेवा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि जगातील इतर अनेक विकसनशील देश वाढत्या महागाईला तोंड देत आहेत. कोरोना मुळे जगातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला होता. लॉक डाऊनमुळे जगातील सर्व देशांचे पर्यटन बंद झाले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पर्यटन खुले झाले आहे. मागील काही महिन्यांत भारतातील हॉटेल सेक्टरमध्ये चांगली वाढ झालेली दिसून येत आहे. हॉटेल कंपनीचे शेअर्स ही बाजारात अप्रतिम कामगिरी करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात चांगला नफा कमावून दिला आहे. आज आपण या लेखात हॉटेल कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत.

टाटा समूहातील कंपनी Indian Hotels Company हॉटेल सेक्टर मधील दिग्गज कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्स ने चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, हॉटेल सेक्टरमधील lemon Tree Hotels कंपनीचे शेअर्स 83 टक्के वर गेले आहेत. EIH Ltd कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. Chalet Hotels कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांचा मजबूत परतावा कमावून दिला आहे. Oriental Hotels कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त वर गेले आहेत. सणासुदीचे दिवस आले आहेत. बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांना हॉटेल शेअर्समध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

हॉटेल्स सेक्टरमधील शेअर्स वाढण्याचे कारण :
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, हॉटेल उद्योग हे आजकाल गुंतवणूकदारांच्या फोकस मध्ये आले आहे. गुंतवणूकदारानी हॉटेल्स कंपनीच्या स्टॉक मध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे. कोविड-19 च्या लॉकडाऊन नंतर हा सणासुदीचा पहिला असा काळ आहे, जेव्हा पर्यटनावर कोणतेही प्रतिबंध नाही. सणाचा मोठा हंगाम सुरू झाल्यामुळे हॉटेल कंपनीच्या शेअर्समध्ये दुप्पट ते तिप्पट परतावा पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पर्यटनात चांगलीच चलबिचल सुरू आहे. कोविड-19 नंतर संघटित हॉटेल्स कंपन्यांचा व्यापार हिस्सा सातत्याने वाढत चालला आहे आणि त्यामुळे या हॉटेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून येत आहे.

हॉटेल्स शेअर्सची लक्ष किंमत :
प्रॉफिटेबल इक्विटीज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बँकांनी व्याजदरात वाढ करत आहेत. मात्र त्यानंतरही खर्चाच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचाच अर्थ या सणासुदीत लोक अधिक खर्च करण्यास तयार असतात, त्यामुळे या सणासुदीच्या अखेरीस आलिशान हॉटेल्स चांगली कमाई करू शकतात. इंडियन हॉटेल्स कंपनी हॉटेलच्या क्षेत्रात सर्वांची पसंतीची आणि लोकप्रिय कंपनी आहे. ही कंपनी व्यापार विस्तार करत असून कंपनी दर महिन्याला 1 हॉटेल्स उघडण्याची तयारी करत आहे. स्टॉक चे चार्ट पॅटर्न पाहिले तर इंडियन हॉटेल्सचा स्टॉक क्लासिकल अपट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे आणि दैनंदिन चार्टमध्ये स्टॉक वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. कंपनीचे शेअर्स पुढील काळात 380 ते 400 रुपये किमतीवर जातील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्समध्ये 300 रुपये ही महत्त्वाची डाऊन सपोर्ट लेव्हल आहे. यानंतर पुढील सपोर्ट लेव्हल 280 रुपये आहे.

गुंतवणूक तज्ञ आणि शेअर बाजार निरीक्षकांच्या मते जर कोणाला धोका पत्करायचा असेल आणि चांगली गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवायचा असेल तर ते लोक भारतीय हॉटेल्सचे शेअर्स बिनधास्त खरेदी करू शकतात. त्याच वेळी, जे लोक थोडीफार जोखीम घेऊन मल्टीबॅगर नफा कमावण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी 70-72 रुपयांच्या श्रेणीत लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स 115 रुपये या लहान लक्ष्यासाठी घेऊन होल्ड करावे. लेमन ट्री साठी स्टॉप लॉस 60 रुपयेच्या खाली सेट करावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Hotel industry shares price and return on investment on 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x