17 April 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Multibagger Stocks | असे शेअर्स निवडा की अल्पावधीत आयुष्य बदलेल, IFL शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 21 लाख रुपये परतावा दिला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आयएफएल एंटरप्रायझेस या स्मॉल कॅप कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. यासह कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते आणि स्टॉक स्प्लिट शेअरचे विभाजन देखील केले होते. IFL एंटरप्रायझेस कंपनीचा IPO मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 20 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. (IFL Share Price)

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 21 मार्च 2020 रोजी बीएसई निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या IPO मधे एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 1 लाख 20 हजार रुपये जमा करावे लागले होते. आता मात्र त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाख 63 हजार रुपये झाले आहे. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 14.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट तपशील

मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 14.42 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार 21 सप्टेंबर 2022 रोजी IFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 शेअरच्या बदल्यात 1 बोनस शेअर मोफत दिला होता.

21 एप्रिल 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत दिला होता. 21 एप्रिल 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात स्प्लिट करण्यात आले होते. म्हणजेच या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या 10 तुकड्यांमध्ये विभागले होते.

गुंतवणुकीवर परतावा

ज्या गुंतवणूकदारांनी आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या शेअरची संख्या बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसह 1,50,000 शेअर्स झाली आहे. या स्मॉल-कॅप कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 6000 शेअर्स जारी केले होते. म्हणजेच, 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, गुंतवणूकदाराच्या शेअरची संख्या 12,000 झाली. आणि त्यानंतर, 1:4 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केल्यानंतर, शेअर धारकांच्या शेअरची संख्या 15,000 झाली.

त्यानंतर कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजित करून गुंतवणुकदारांना 15,000 शेअर्सवर 1,50,000 शेअर्स जारी केले. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची किंमत सध्या आज 14.66 रुपये आहे. त्यानुसार गुंतवणुकदाराच्या 150000 शेअर्सचे मूल्य 2,199,000 रुपये झाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of IFL Enterprises share price on 18 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या