Multibagger Stocks | या शेअरने 230 टक्के पेक्षा अधिक मल्टीबॅगर परतावा दिला, तेजीत असलेला हा स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stocks | NDR ऑटो कॉम्पोनंट्सचे शेअर्स मागील 25 महिन्यांपूर्वी 120 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 500 रुपये पर्यंत गेले आहे. या कालावधीत NDR ऑटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. ऑटो स्टॉक मध्ये मागील काही महिन्यांपासून चढ उतार पाहायला मिळत होते. दिग्गज ऑटो कंपनींचे शेअर्स देखील कमालीचे कोसळले होते. पण आता कुठे ऑटो सेक्टर मध्ये सुधारणा होताना दिसत आहे. पुढील येणाऱ्या काळात ऑटो सेक्टर मध्ये मागणी वाढेल असे संकेत मिळत आहेत.
NDR ऑटो कॉम्पोनंट्स – 230 टक्के पेक्षा अधिक परतावा :
NDR ही एक ऑटो कंपोनेंट्स बनवणारी कंपनी असून, मागील 2 वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. एनडीआर कंपनी ही ऑटो कॉम्पोनंट्स सेगमेंट मध्ये उद्योग करणारी एक दिग्गज कंपनी म्हणून नावाजली आहे. मागील 25 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 120 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढुन 500 रुपयांच्या किमतीपर्यत गेले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. NDR ह्या ऑटो पार्टस बनवणाऱ्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 519 रुपये होती. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 301.30 रुपये होती.
7 ऑगस्ट 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर NDR ऑटो कॉम्पोनंट्सचे 4 लाखांहून अधिक शेअर्स ट्रेड झाले होते, ज्यातील 1 लाख शेअर्सचा व्यवहार 120.95 रुपये किंमत पातळीवर झाला होता. 16 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 505 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 25 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.17 लाख रुपये झाले असते. NDR ऑटो कॉम्पोनंट्सच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात जवळपास 13 टक्केची उसळी पाहायला मिळाली होती.
NDR कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील तीन महिन्यात सुखद धक्का बसला आहे. मागील 3 महिन्यांत ह्या स्टॉकने 300 रुपयेपासून ते 500 रुपयेचा पल्ला गाठला आहे. NDR ऑटो कॉम्पोनंट्सच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत कमालीची कामगिरी केली आहे. 20 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 303.45 रुपयांच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी NDR कंपनीचे शेअर्स BSE वर 505 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 महिन्यांपूर्वी NDR कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.67 लाख रुपये झाले असते. मागील 6 महिन्यांत या ऑटो पार्टस बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 27 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of NDR auto components share price return on 17 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे