21 November 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर्स 4 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO 36 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र या कंपनीचे शेअर 52.5 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ( आरबीएम इन्फ्राकॉन कंपनी अंश )

तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1,528 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.58 लाख रुपये झाले आहे. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर 5.00 टक्के घसरणीसह 530.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 586.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड फर्मच्या मते, आरबीएम इन्फ्राकॉन स्टॉक पुढील काळात 600 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 744 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर या शेअरची नीचांक किंमत पातळी 50.50 रुपये होती. या नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक तब्बल 867.41 टक्के वाढला आहे.

आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीला यावर्षी अनेक वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. मागील आठवड्यात नायरा एनर्जी कंपनीने आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीला 22.2 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह कंपनीला BN Agritech Ltd कंपनीने 81.75 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. याव्यतिरिक्त आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीला लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीने 5.89 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. तसेच आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीला मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेडकडून 9.5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीमध्ये आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीने 33 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर या कंपनीच्या महसूल संकलनात 10.6 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

वार्षिक आधारावर या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,206.4 टक्के वाढ झाली आहे. आरबीएम इन्फ्राकॉन ही कंपनी मुख्यतः तेल आणि वायू शुद्धीकरण, गॅस क्रॅकर प्लांट्स, कोळसा, वायू आणि पाण्यावर आधारित पॉवर प्लांट्स, पेट्रोकेमिकल्स, रसायने, सिमेंट आणि खतांसाठी यांत्रिक आणि रोटरी मशिनरीं संबंधित व्यावसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of RBM Infracon Share Price NSE Live 12 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x