Multibagger Stocks | या शेअरने 6 महिन्यांत 210 टक्के परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर, या रेकॉर्ड डेट पूर्वी खरेदी केल्यास फायदा निश्चित
Multibagger Stocks | 2022 या वर्षी शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली आहे. असे असूनही, शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असूनही मे 2022 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची घोषणा केली होती.
शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड – Shukra pharmaceutical Share Price :
2022 या वर्षी सुरुवातीला शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता होती. असे असूनही, शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मे 2022 मध्ये या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या भागधारकांना भरघोस लाभांश जाहीर केला होता. जे लोक या लाभांशाच्या रेकॉर्ड डेटची दीर्घकाळ वाट पाहत होते, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. चला तर मग पाहूया रेकॉर्ड तारीख आणि या स्टॉकची कामगिरी सविस्तर
शुक्र फार्मास्युटिकल्स लभांशची रेकॉर्ड तारीख :
28 मे 2022 रोजी कंपनीच्या एजीएममध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्स वर पात्र गुंतवणूकदारांना 0.50 रुपये लाभांश देण्याचा प्रस्ताव मान्य केला. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना 5 टक्के लाभांश देण्यात येईल. या कंपनीने लाभांशासाठी रेकॉर्ड तारीखही ठरवली आहे. शुक्र फार्मास्युटिकल्सच्या लाभांशाची रेकॉर्ड तारीख 22 सप्टेंबर 2022 असेल.
गुंतवणूकदारांना दिला भरघोस परतावा :
2022 या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 128.13 टक्केची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 84.95 रुपये होती, ती आता वाढून तब्बल 193.80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत तब्बल 210.83 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती. गुंतवणुकदारांसाठी मागील ट्रेडिंग महिना जबरदस्त परतावा मिळवून देणारा होता. मागील एका महिन्यात शुक्र फार्मास्युटिकल्सच्या शेअर्सनी तब्बल 10.05 टक्केची उसळी घेतली आहे. 1 वर्षापूर्वी या स्टॉकवर ज्यांनी पैसे लावले होते, त्यांना आता तब्बल 147.19 टक्के परतावा मिळाला असणार. कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 219.80 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत फक्त 47 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 30.34 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Shukra pharmaceutical share price return on 12 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL