18 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stocks | या 4 मल्टीबॅगर शेअर्सनी 15 दिवसात गुंतवणुकीचा पैसा दुप्पट केला, या शेअर्सची यादी सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान, असे काही शेअर्स आहेत ज्यांनी खूप कमी वेळात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असा एक स्टॉक आहे, ज्याने फक्त 15 दिवसांत त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात असेही काही स्टॉक आहेत, ज्यांनी नऊ पट अधिक आणि काहींनी तर 14 पट अधिक रिटर्न दिले आहेत. या कालावधीत सोलेक्स एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना 107 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. तर रिजन्सी सिरॅमिक्सने 103 टक्के, सालासर एक्सटेरियर्स 102 टक्के आणि A&M जंबो बॅग्जने 100 टक्के इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे. चा तर मग या चार शेअर्सच्या किंमतीची वाटचाल पाहू

सोलेक्सने दिला मल्टी बॅगर परतावा :
या कंपनीच्या स्टॉक एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयेवर 9 लाखांहून अधिक परतावा दिला आहे. सोलेक्स एनर्जी ही इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी असून, या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या भागधारकांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या समभागाने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना एक लाख रुपये गुंतवणुकीवर 9 लाखाहून अधिक नफा कमावून दिला आहे. फक्त एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 819 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 42.50 रुपये होती. आणि उच्चांकी पातळी किंमत 420.30 रुपये आहे. मागील एका महिन्यात या शेअरने आपल्या भागधारकांना सुमारे 150 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

रिजन्सी सिरॅमिक्स :
बिल्डिंग मटेरियलचे उत्पादन करणारी कंपनी रिजन्सी सिरॅमिक्सनेही एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपये गुंतवणुकीवर 14 लाखांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअर्सनी 1326 टक्केचा परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात 183 टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 27.10 रुपये आहे. आणि स्टॉकची नीचांक पातळी किंमत 1.85 रुपये होती.

सालासर एक्सटेरियर्स :
सालासर एक्सटेरियर्स आणि कॉन्टूरच्या शेअर्सनी मागील काही काळात कमालीची कामगिरी केली आहे. एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील एका आठवड्यात 146 टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीने या चालू वर्षात आपल्या भागधारकांना 1551 टक्केचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी जेर तुम्ही या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.51 लाख झाले असते. ह्या स्टोकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 263.85 रुपये होती, तर नीचांकी पातळी किंमत फक्त 20 रुपये होती.

ए अँड एम जंबो बॅग :
या कंपनीचे शेअर्स देखील मागील काही आठवड्यापासून कमालीची कामगिरी करत आहेत. अनेक दिवसांपासून कंपनीच्या शेअर्स मध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. वरील तीन स्टॉकनी एका वर्षात A&M सारखी कामगिरी केली नसली तरी A&M ने आपल्या गुंतवणूकदारांना एका आठवड्यात 63 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे. तर महिनाभरात ह्या स्टॉक ने जबरदस्त उसळी घेतली असून सध्या तो उच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत A & M च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 136 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 13.30 रुपये होती, आणि नीचांकी पातळी किंमत 5.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Newe Title| Multibagger Stocks of Small cap companies has given huge return in short term in 17 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x