24 February 2025 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर 2.42 टक्क्यांनी घसरला, स्टॉक प्राईस 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ - NSE: GTLINFRA
x

Multibagger Stocks | या स्टॉकच्या गुंतवणूकदारांना 3800 टक्के परतावा, हा शेअर पुढे तेजीत येणार, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Multibagger stocks

Multibagger Stocks | जून 2022 च्या तिमाहीत टायटन कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 3825 टक्के वाढला आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की टायटनचे शेअर्स 2800 रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकतात. जून तिमाहीत टायटन कंपनीचा नफा 785 कोटी रुपये होता.

एप्रिल ते जून 2022 च्या तिमाही निकालानंतर टायटन कंपनीच्या शेअर्सवर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. जून 2022 च्या तिमाहीत टायटनचा नफ्यात वार्षिक 3825 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांनी टायटनच्या शेअर्सची पुढील लक्ष किंमत 2800 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. जून 2022 च्या तिमाहीत टायटनच्या निव्वळ नफ्यात 3825 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि नफा 785 कोटी रुपयांवर गेला होता. टायटनला वर्षभरापूर्वी याच काळात फक्त 20 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 8 ऑगस्ट 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर टायटनचे शेअर्स 2445.75 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहेत.

2800 ची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लिल्लाधर यांनी टायटन कंपनीची लक्ष्य किंमत 2607 रुपये पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी आता 2607 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. यापूर्वी टायटनच्या शेअर्सची लक्ष्य किंमत 2520 रुपये जाईल असा अंदाज होता. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की, बाजारातील वाटा, मजबूत ताळेबंद, फ्रँचायझी आधारित मॉडेल आणि मजबूत ब्रँड व्यालू पाहता टायटन शेअर्सबाबत आमचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पुढील काळासाठी टायटन कंपनीच्या शेअर्ससाठी 2800 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. म्हणजेच, सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत टायटनच्या शेअर्स किमतीमध्ये सुमारे 14 टक्के ची उसळी पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज हाऊसने टायटनच्या शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी ही बाय (खरेदी) रेटिंग कायम ठेवली आहे.

झुनझुनवाला कुटुंबाची गुंतवणूक :
दिग्गज गुंतवणूकदार आणि भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाचा टायटन कंपनीमध्ये 5 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत टायटन चा निव्वळ नफा जवळपास 54.टक्के वाढला होता. आणि मार्च 2022 च्या तिमाहीत निव्वळ नफा 510 कोटी रुपये होता. त्याच वेळी, जून 2022 च्या तिमाहीत टायटनचा नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती निव्वळ नफा 785 कोटी रुपये झाला होता. टायटनचे एकूण एकत्रित उत्पन्न जून 2022 च्या तिमाहीत जवळपास 170 टक्क्यांनी वाढले आणि जवळपास 9,487 कोटी रुपयेवर पोहोचले होते. जे मागील वर्षीच्या कालावधीत 3519 कोटी रुपये होते. बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा टायटनमध्ये 5 टक्के पेक्षा जास्त वाटा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Titan company Share Price in focus on 9 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)titen(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony