27 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा! किरकोळ ते दिग्गज गुंतवणूकदारांना नेहमी मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर विसरू नका

Multibagger Stocks

Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आता हा स्टॉक वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 100,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्सने 3 टक्के वाढीसह 3347.45 रुपयेही आपली उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 3,335.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाने टायटन कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला कुटुंबाने टायटन कंपनीचे 4 कोटी पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. जून 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 4,75,95,970 शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 5.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

मार्च 2023 पर्यात रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 5.29 टक्के भाग भांडवल होते. याचा अर्थ मार्च 2023 नंतर रेखा झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत टायटन कंपनीचे 6 लाखांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत.

रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअर्समधून एका दिवसात 460 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी टायटन कंपनीचे शेअर्स 3250.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर चालू आठवड्यात सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3347.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच अवघा एका दिवसात हा स्टॉक 97 रुपये वाढला होता. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 40595900 शेअर्स आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या किमतीनुसार गणना केली तर रेखा झुनझुनवाला यांना एका दिवसात 460 कोटी रुपये नफा मिळाला आहे.

एकेकाळी टायटन कंपनीचे शेअर्स 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3347.45 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. टायटन कंपनीच्या या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105000 टक्के वाढवले आहेत.

जर तुम्ही 1 ऑगस्ट 2003 रोजी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.62 कोटी रुपये झाले असते. या मध्ये फक्त शेअरच्या किमती मधील वाढ मोजण्यात आली आहे, कंपनीने वाटप केलेले बोनस शेअर्स मोजल्यास हा नफा अनेक पट वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Titan share price today 20 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x