14 November 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Multibagger Stocks | सर्व बाजूने पैसा, या शेअरने 750% परतावा दिला आणि त्यासोबत फ्री बोनस शेअर्स मिळविणार, हा स्टॉक खरेदी करावा का?

Multibagger stock

Multibagger Stocks | मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून आपल्या भागधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, म्हणजेच कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. विरम सिक्युरिटीजच्या संचालक मंडळाने नुकताच बोनस शेअर जारी करण्यासाठी रेकॉर्ड तारखेत बदल केला आहे. आधी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 14 ऑक्टोबर 2022 होती, त्यात सुधारणा करून कंपनीच्या संचालक मंडळाने 15 ऑक्टोबर 2022 ही नवीन रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. विरम सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 14 ऑक्टोबर 2022 रोजी एक्स-बोनसवर ट्रेड करतील.

गुंतवणुकीवर परतावा :
विरम सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील साडेपाच वर्षात विरम सिक्युरिटीजच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 750 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 31 जुलै 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 3.80 रुपये किमतीला ट्रेड करत होते. 12 ऑक्टोबर 2022 रोजी वीरम सिक्युरिटीजचे शेअर्स BSE निर्देशांकावर 33.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 31 जुलै 2017 रोजी विरम सिक्युरिटीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.70 लाख रुपये झाले असते.

शेअर्सचे विभाजन :
विरम सिक्युरिटीज कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट केले होते. विरम सिक्युरिटीज कंपनीने पुन्हा एकदा 2022 मध्ये स्टॉक स्प्लिट केले आहेत. 18 एप्रिल 2022 रोजी या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स एक्स-स्प्लिट प्राईसवर ट्रेड करत होते. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीच्या संचालक मंडळाने 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याला मान्यता दिली. म्हणजेच 10 रुपयांचे दर्शनी मूल्य असलेला शेअर 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअरमध्ये विभाजित करण्यात आला होता. विरम सिक्युरिटीजच्या शेअर्स ने चालू वर्षांत आपल्या भागधारकांना 69 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 68 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of Veeram Securities Limited share price return on investment on 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x