31 January 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | हा स्टॉक 7 रुपयांना खरेदी केला आणि गुंतवणूदारांनी संयम ठेवला, 1 लाखाचे तब्बल 1.20 कोटी झाले

Multibagger stock

Multibagger Stocks | जर तुम्ही 19 वर्षांपूर्वी रॅडिको खेतानच्या स्टॉकमध्ये 7.60 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणूकीचे 1.20 कोटी रुपये झाले असते.

मल्टीबॅगर स्टॉक:
शेअर बाजारात संयम बाळगणाऱ्या आणि विचारपूर्वक पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना श्रीमंत होण्याच्या अनेक संधी भेटत असतात. असे म्हणतात की जर तुम्ही 10 वर्षे शेअर मार्केटमध्ये स्टॉक होल्ड करू शकत नसाल, तर शेअर बाजारापासून लांब रहा. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दीर्घकाळात त्यांनी केलेली गुंतवणूक किती परतावा आणि नफा देते हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला रॅडिको खेतानच्या शेअर्सची कामगिरी पाहणे आवश्यक आहे.

विक्रीचे वादळ असूनही स्टॉकने उसळी घेतली :
मागील वर्षभरात शेअर बाजारात विक्रीचे वादळ असूनही, भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत. त्यापैकीच एक रॅडिको खेतानचा स्टॉक आहे. 19 वर्षांपूर्वी हा शेअर फक्त 7.60 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता. तो त्यावेळी पेनी स्टॉकपैकी एक होता. रॅडिको खेतानच्या शेअरची किंमत आज सुमारे 919 रुपये वर पोहोचली आहे. याचा अर्थ असा होतो की, मागील 19 वर्षांमध्ये, हा मल्टीबॅगर बॅगर स्टॉक फक्त 7.6 रुपये वरून तब्बल 919 रुपयेपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे या कालावधीत गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक 120 पट वाढली आहे.

Radico खेतान शेअर सविस्तर :
मागील एका वर्षात हे शेअर 855 रुपयेवरून 919 रुपये पर्यंत वाढले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत शेअर्स नी 8 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. 5 वर्षांपूर्वी शेअर 140 रुपयेवर ट्रेड करत होता. 140 रुपये वरून स्टॉक ची किंमत आता 919 पर्यंत गेली आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 560 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, 19 वर्षांपूर्वी स्टॉक फक्त 7.60 वर ट्रेड करत होता. पण आता हा स्टॉक 919 रुपयेपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना ताबल 11,990 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

गुंतवणुकीवर परिणाम :
जर तुम्ही एका वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुमच्या 1 लाख रुपये आज 1.08 लाख झाले असते. आणि 5 वर्षापूर्वी जर तुम्ही एक लाख गुंतवणूक केली असती तर या 5 वर्षांत तुमची गुंतवणूक रक्कम 6.60 लाखांवर गेली असती. त्याचप्रमाणे, जर तुम्ही या शेअरमध्ये 19 वर्षांपूर्वी 7.60 प्रति शेअर दराने 1 लाख गुंतवले असते, आणि तुम्ही हा स्टॉक दीर्घ कालावधीसाठी होल्ड करून ठेवला असता तर तुमच्या 1 लाख रूपये ने तुम्हाला आता 1.20 कोटी रुपये इतका जबरदस्त परतावा दिला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Radico khetan share price return on 10 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)Radico khetan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x