22 November 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | छप्पर फाड प्रॉफिट, 6 महिन्यांत 600 टक्के पेक्षा जास्त परतावा आणि 2:1 बोनस शेअर

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर मार्केट कधी पडेल आणि कधी वाढेल ह्याचा नेम नाही, कोणत्या गोष्टीचा काय परिणाम कोणत्या स्टॉक वर कसा होईल आणि शेअर किती वाढेल किंवा पडेल हे थक्क करणारे आहे. असाच एक स्टॉक मार्केट मध्ये ट्रेड करतोय तो म्हणजे रजनीश वेलनेस लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्सनी मागील ६ महिन्यांत गुंतवणूकदारांना ६००% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. रजनीश वेलनेसचे शेअर्स ३३ रुपयांवर ट्रेड करत होते आणि आता ३३ रुपयांवरून हा शेअर २३४ रुपयांपर्यंत वाढलाआहे. तब्बल ६००% नफा.

कंपनी २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार :
ही रजनीश वेलनेस कंपनी फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीशी निगडीत आहे, या कंपनीच्या शेअर्सने मागील ६ महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त खुश केले आहे, खुश तर होणारच ना या कंपनीने ६ महिन्यात ६००% परतावा दिला आहे. साधे सुधे नाही, मार्केट एवढा अस्थिर असून देखील या काळात रजनीश वेलनेसचे शेअर्स ३३ रुपयांवरून २३४ रुपयांपर्यंत वाढला. कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देणार आहे. कंपनी २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९.१० रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक २४५ रुपये आहे.

बोनस शेअरची एक्स-डेट २१ जुलै २०२२ :
रजनीश वेलनेस लिमिटेड २:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार असे जाहीर केले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर्स मिळतील. बोनस शेअरची एक्स-डेट २१ जुलै २०२२ आहे. त्याच वेळी, बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख २२ जुलै २०२२ आहे. आकडेवारीच्या निरीक्षण केले तर आपल्या दिसेल की रजनीश वेलनेसच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना ६१५ टक्के परतावा दिला आहे. १७ जानेवारी २०२२ रोजी रजनीश वेलनेसचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ३२.८५ रुपये वर ट्रेड होत होते. १५ जुलै २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर २३४.६५ रुपयांवर बंद झाले. ह्याचा अर्थ असा की मागील सहा महिन्यात कंपनीच्या शेअर किमतीत ३२.८५ ₹ ते २३४.६५₹ इतकी जबरदस्त वाढ झाली आहे. गमतीशीर गोष्ट अशी की जर तुम्ही ६ महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर, सध्या तुम्हाला ७.१४ लाख रुपये छप्पर फाड नफा झाला असता.

आतापर्यंत एकूण १०४७ टक्के परतावा :
रजनीश वेलनेसच्या शेअर्सने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना एकूण १०४७ टक्के परतावा मिळवून दिला आहे. २०२२ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ३ जानेवारी रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये २०.४५ रुपये वर ट्रेड करत होते. १५ जुलै २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २३४.६५ रुपयांवर बंद झाले. सहा महिन्यात ह्या शेअर ने इतका जबरदस्त नफा दिला की जर तुम्ही २०२२ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ६ महिन्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि आज जुलै महिन्यापर्यंत तुमची गुंतवणूक कायम असती तर सध्याच्या घडीला ही रक्कम ११.४७ लाख रुपये झाली असती. म्हणजे १ लाखाचे ११.४७ लाख झाले असते. रजनीश वेलनेसच्या शेअर्सनी गेल्या १ वर्षात २१७५ % टक्के वाढला आहे. कंपनीचे शेअर्स मागील वर्षी १०.३९₹ वर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title: Multibagger Stocks Rajnish wellness Share Price return on 18 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x