22 February 2025 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Multibagger Stocks | 1460 टक्के मल्टीबॅगर परतावा देणारा हा शेअर 3 दिवसात 40 टक्क्याने स्वस्त, ही गुंतवणुकीची संधी?

Multibagger stock

Multibagger Stocks | तान्ला प्लॅटफॉर्म्स भारतीय शेअर बाजारात एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखला जातो. मागील पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,476% पेक्षा जास्त बंपर परतावा दिला आहे. मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ह्या स्टॉकमध्ये 40% पेक्षा जास्त पडझड झालेली दिसत आहे. बुधवारच्या व्यवहारात, स्टॉक सुमारे 19 टक्क्यांनी घसरून 591 च्या आसपास ट्रेड करत होता. आज स्टॉक मोठ्या घसरणीसह सुरू झाला आहे.

ठळक मुद्दे :
1 गेल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकमध्ये 40% पेक्षा जास्त पडझड झाली आहे.
2. बुधवारी स्टॉक सुमारे 19 टक्क्यांनी घसरला आणि 591 रुपये वर ट्रेड करत होता.
3. कंपनीचे अनेक मोठे ग्राहक सोडून गेल्याचे समजते.

वार्षिक आधारावर नफ्यात घट :
कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत निकालांमध्ये वार्षिक आधारावर नफ्यात घट नोंदवली आहे. तानला प्लॅटफॉर्म ने मार्च तिमाहीत 140 कोटीच्या तुलनेत 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत 100 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. या तिमाहीतील महसूल मागील तिमाही पेक्षा 6.2 टक्के कमी झाला असल्याचे समजते. भारतातील ब्रोकरेज अँड रिसर्च फर्म येस सिक्युरिटीजने निकालावर प्रतिक्रिया दिली आहे की या तिमाहीचे निकाल संमिश्र कामगिरी दर्शवत आहेत.

ब्रोकरेज कंपन्यांचे मत काय :
ब्रोकरेज संस्थेने आपल्या प्रतिक्रियेतमध्ये म्हटले आहे की पहिली तिमाही नफ्याच्या बाबतीत कमजोर राहिली आहे आणि त्यामुळे महसूल आणखी खाली गेला आहे. एबिटा मार्जिनही खाली गेला आहे. कंपनीवर वाढत्या किंमतीचा दबाव दिसून येत आहे. कंपनी भारतातील CPaaS स्पेसमध्ये आघाडीवर आहे, जी इतर उद्योगापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. ब्रोकरेज हाऊसने म्हंटले आहे की CPaaS आधारित A2P मेसेजिंगचा अवलंब उद्योगांमध्ये एंटरप्राइझ आणि प्लॅटफॉर्म या दोन्ही विभागांसाठी व्हॉल्यूम मध्ये प्रचंड वाढ करत आहे.

कंपनीचे मोठे ग्राहक सोडून गेले :
कंपनीच्या उद्योगाबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीचे अनेक मोठे ग्राहक कंपनीची सेवा सोडून दुसऱ्या कंपनीकडे गेले आहेत. गुगल आणि एसबीआयसारखे मोठे ग्राहक कंपनीची सेवा सोडून गेले. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामावर आणि नफ्यावरही दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीची स्थिती सुधारेल अशी आता काही काळ वाट पहावी लागेल. जर कंपनीत पुन्हा अपट्रेंड आला तर तुम्ही गुंतवणुकीचा विचार नक्की करू शकता.

1 लाखाच्या गुंतवणुकीचे 5.14 कोटी झाले होते :
तान्ला प्लॅटफॉर्मचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज 2 ऑगस्ट 2013 रोजी 2.67 रुपयेच्या पातळीवर ट्रेड करत होते, गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये सध्या 5 कोटी पेक्षा जास्त झाले आहे. मे 2022 च्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 1,375 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्सनी 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 45,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर तुम्ही 2 ऑगस्ट 2013 रोजी तान्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे पैसे 5.14 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title | Multibagger Stocks Tanla platform Shar Price return on share price on 28 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x