19 April 2025 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Multiple Saving Accounts | तुमची बँकेत एकापेक्षा अधिक बचत खाते असण्याचे खूप मोठे आर्थिक फायदे असतात, ते फायदे लक्षात ठेवा

Multiple saving accounts

Multiple Saving Accounts | बचत खाते हे बँकेत पैसे जमा करून बचत करण्याचे साधन आहे. तुम्ही बचत खाते कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय बँकेत उघडू शकता. बचत बँक खाती लोकांना त्यांचे पैसे बचत करण्याचा आणि आवश्यकतेनुसार त्वरित काढण्याचा पर्याय देते. तथापि, आपल्या देशात अनेक राष्ट्रीय आणि खाजगी बँका असल्याने, आपल्यासाठी कोणती बँक खाती चांगली आहेt याबद्दल ग्राहक गोंधळून जातात. कोणते बचत खाते चांगजे आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संशोधन करावे लागेल. जर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त बचत खाती उघडली पाहिजेत असा सल्ला आर्थिक तज्ञ देतात.

भारतातील लोक वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेक बचत खाती उघडू शकतात आणि त्याचे आर्थिक व्यवस्थापन करू शकतात. तुमच्याकडे किती बचत खाती असू शकतात यावर कोणतीही मर्यादा नाही. एखाद्या व्यक्तीकडे तीनपेक्षा अधिक बचत खाती नसावीत असा सल्ला दिला जातो. कारण खुप जास्त बचत खाती व्यवस्थापित करणे देखील कठीण होऊ शकते.

एका पेक्षा अधिक बचत खाती असणे कधी कधी फायदेशीर ठरते. एका नागरिकाकडे किती बँक खाती असावीत याचे कोणतेही बंधन नाही. कारण हा निर्णय पूर्णपणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतो. आर्थिक तज्ञांचा असा विश्वास आहे की एका पेक्षा अधिक बँक खाती असणे आणि प्रत्येक बँक खाते त्याच्या स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे ठेवणे, आपल्याला आपली विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे, एकापेक्षा जास्त खाती असणे नक्कीच एक चांगली युक्ती आहे.

एका पेक्षा अधिक बचत खाते असण्याचे फायदे काय आहेत :
१) पैशाचे उत्तम व्यवस्थापन- प्रत्येक व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी असतात. प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी स्वतंत्र खाती असल्‍याने तुम्‍हाला मुलाचे शिक्षण, आपत्‍कालीन निधी, मासिक खर्च अश्या विविध उद्देशांसाठी तुमच्‍या बचतीची देखरेख करणे आणि मागोवा घेणे सोपे जाईल. यामुळे तुमच्या बचतीतून उधळपट्टी होण्याची शक्यताही कमी होते.

2) उद्दिष्टांसाठी स्वयंचलित बचत: वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी स्वतंत्र बचत खाती उघडल्यानंतर, आता फक्त तुम्हाला तुमच्या मुख्य खात्यातून एका विशिष्ट कालमर्यादेवर निधी हस्तांतरित करायचे आहे. स्वयंचलित सेवा सुरू केल्यास पैसे आपोआप खात्यांमध्ये जमा होतील. तुमच्या आर्थिक ध्येयांसाठी बचत केल्यावरच इतर गोष्टींवर खर्च करा.

3) एका पेक्षा जास्त खाती असल्‍याने तुमच्‍यासाठी विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करणे, व्‍यवस्‍ थापन करणे, देखरेख करणे आणि आर्थिक मागोवा ठेवणे सोपे होईल.

4) डेबिट कार्डमधून पैसे काढण्याची ठराविक मर्यादा असते. आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला जास्त पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

५) विविध बचत खाती आल्यावर तुम्हाला एका पेक्षा अधिक डेबिट कार्डे मिळतात, जी तुम्ही अशा प्रकरणांमध्ये वापरू शकता.

६) विमा संरक्षण आपत्कालीन परिस्थितीत एकूण विमा संरक्षण आता प्रति बँक खाते 5 लाख रुपये आहे जे पूर्वी १ लाख होते.

७) दिवाळखोरीच्या परिस्थितीतही अनेक बचत खाती प्रभावी ठरू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multiple saving accounts for hidden benefits on 17 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Multiple saving accounts(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या