24 November 2024 10:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Mumbai Coastal Road Project | मुंबईतील सागरी प्रकल्पाच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी

Mumbai Coastal Road Project

मुंबई, ०१ ऑक्टोबर | मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी (Mumbai Coastal Road Project) प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा ५०० मीटरवरून थेट ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.

The Coastal Zone Management Plan (CZMP) for Mumbai and Mumbai Suburbs has been given final approval (Mumbai Coastal Road Project) by the Union Ministry of Environment. This will benefit the pending marine projects in Mumbai :

मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. बांधकाम मर्यादा ५०० मीटरवरून ५० मीटरवर आणण्यात आली आहे. सोबतच सीआरझेड २०१९ ची अधिसूचना मंजूर करण्यात आल्याने याचा फायदा प्रलंबित प्रकल्पांना होणार आहे. सागरी हद्द व्यवस्थापन आराखडा मंजूर होत नसल्यामुळे सीआरझेड २०१९ अजूनपर्यंत लागू होऊ शकत नव्हते. मात्र, आता त्याला मंजुरी मिळाल्यामुळे बांधकामाची मर्यादा ५०० मीटरवरून थेट ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे.

मुंबईत अशा प्रकारे सीआरझेड लागू केल्यामुळे अनेक प्रकल्पांचं बांधकाम रखडलं होतं. कोस्टल रोडसाठी देखील समुद्रात काही प्रमाणात बांधकाम करावं लागणार आहे. न्हावा-शेवा मार्गासाठी देखील पाणथळ जागेत पिलर टाकावे लागणार आहेत. त्यासाठी देखील बांधकाम आवश्यक आहे. अशा प्रकल्पांसाठी परवानगी घेणं आवश्यक ठरतं. या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटरऐवजी ५० मीटरपर्यंत मर्यादा आल्यामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

भूपेंद्र यादव अलिकडेच नवी मुंबईच्या दौर्‍यावर असताना एक विशेष बैठक मुंबईत आयोजित करून यासंदर्भातील विनंती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केली होती. त्याचवेळी येत्या १५ दिवसांत ही प्रक्रियेला गती देण्यात येईल, असे आश्वासन भूपेंद्र यादव यांनी दिले होते. त्यानंतर या मंजुरीची प्रत आज जारी करण्यात आली आहे. सीझेडएमपीचा आराखडा हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना तयार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करीत तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती. यामुळे पर्यटन क्षेत्र, त्या क्षेत्रातील रोजगार आणि एकूणच पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. एमएमआर क्षेत्रात सिडकोच्या प्रकल्पांसह इतरही विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. त्वरेने हा निर्णय घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.

कसा आहे कोस्टल रोड?
पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी ‘शामलदास गांधी उड्डाणपूल’ (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा एकूण 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे.

याचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वरळी सी लिंक असा आहे. याचं काम मुंबई महापालिका (BMC) करत असून, यासाठी पालिका 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडच्या कामाने आता वेग घेतला आहे. या कामासाठी आतापर्यंत 1281 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे:
कोस्टल रोड हा एक आव्हानात्मक आणि निसर्गाला चॅलेंज देणारा असा खडतर मार्ग आहे. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mumbai Coastal Road Project got approval from union environment ministry.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x